Shreya Maskar
नगरधन किल्ला नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ आहे. हा एक भुईकोट प्रकारातील किल्ला आहे.
नगरधन किल्ला वाकाटक काळात बांधला गेला आणि त्याचे जुने नाव 'नंदीवर्धन' होते. हा किल्ला वाकाटक साम्राज्याची पहिली राजधानी होता.
नगरधन किल्ला इतिहासप्रेमींसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. नगरधन किल्ल्याचा राणी प्रभावती गुप्त यांच्याशी संबंध आहे.
नगरधन किल्ला शिल्पकलेचा आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.तुम्ही येथे जाऊन फोटोशूट करू शकता.
नगरधन किल्ल्यामध्ये भवानीमातेचे मंदिर आहे, जे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
नगरधन किल्ल्याच्या जवळ एक संग्रहालय आहे. हे संग्रहालय नगरधन किल्ल्याच्या परिसरातच आहे.
नागपूर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने किंवा बसने नगरधन किल्ल्याला भेट देऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.