Shreya Maskar
वाराणसी हे जगातील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हिवाळ्यात येथे आवर्जून भेट जा. हे एक धार्मिक ठिकाण आहे.
वाराणसीमधील एक प्रमुख पर्यटन आकर्षण म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर, जे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
गंगा आरतीत सहभागी होण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. गंगा नदीच्या वाराणसीतील काठावर ८४ घाट आहेत.
दशाश्वमेध घाट वाराणसीमधील सर्वात प्रसिद्ध घाट आहे आणि येथे होणाऱ्या रोजच्या 'गंगा आरती'मुळे तो जगभरात ओळखला जातो.
गंगा नदीमध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकता. येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वाराणसी हे त्याच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. आयुष्यात एकदा तरी येथे आवर्जून भेट द्या.
वाराणसीला गेल्यावर सारनाथ आणि बनारस हिंदू विद्यापीठातील भारत कला भवन संग्रहालयाला भेट द्या. येथे मणिकर्णिका घाट देखील आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.