Shreya Maskar
मसूरी हे उत्तराखंड राज्यातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे, ज्याला 'टेकड्यांची राणी' असेही म्हणतात. हिवाळ्यात हनिमूनसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
निसर्गरम्य दृश्य, घनदाट जंगले, सुंदर दऱ्या , हिवाळ्यात धुक्याची चादर, धबधबे येथे पाहायला मिळतात. कपल ट्रेकिंगसाठी मसूरी एक सुंदर लोकेशन आहे.
मसुरीला भेट दिल्यावर पश्चिम गढवालमधील हिमालयातील शिखरांचे विहंगम दृश्य दिसते. मसुरीमध्ये कॅम्पिंगचा आनंद घेता येतो.
मसूरीला गेल्यास, तुम्ही मॉल रोड, केम्प्टी फॉल्स, गन हिल, ज्वाला देवी मंदिर, कंपनी गार्डन आणि लांदूर यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
मसुरीमध्ये मसुरी तलाव, दलाई हिल्स, आणि बेनोग वन्यजीव अभयारण्य ही निसर्गरम्य ठिकाणे आहेत. येथे तुम्ही भन्नाट कपल फोटोशूट करू शकता.
मसूरी येथील गन हिलला केबल कारने पोहोचता येते. येथून व्हॅली आणि हिमालयाचे विहंगम दृश्य दिसते. सूर्यास्त आणि सूर्योदयाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
मसुरीतील बेनोग वन्यजीव अभयारण्याला भेट देऊन विविध प्रकारचे पक्षी आणि वन्यजीव पाहू शकता.
मसूरी हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आवर्जून जा. तुम्हाला थंड, गुलाबी वातावरण अनुभवता येईल.