Maharashtra Live News Update: अकोला स्थानिक स्वराज निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालं चिन्ह

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५, राज्यातील थंडीला ब्रेक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, राज्यात थंडीची लाट, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

अकोला स्थानिक स्वराज निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालं चिन्ह

चित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगरसेवकांना 'गॅस सिलेंडर' चिन्ह मिळालं. अकोला जिल्ह्यातील 5 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. यात वंचित बहुजन आघाडी देखील मैदानात आहे.. केवळ बार्शीटाकळी नगरपंचायतमधील वार्ड क्रमांक 15च्या एका नगरसेवकाच्या उमेदवाराला वळगता, जिल्ह्यातील सर्वच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि नगरसेवकाला 'गॅस सिलेंडर' चिन्ह मिळालं. दरम्यान, अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने अकोट, तेल्हारा, हिवरखेड, मूर्तिजापूर नगरपालिका आणि बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले आहेत. मात्र, बाळापुर नगरपालिकासाठी स्थानिक नगर विकास पार्टीला वंचितचा पाठींबा आहे.

देवेंद्र फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना अपहरण करून झालेल्या मारहाणीनंतर सपकाळ श्रीरामपूरमध्ये दाखल. घटनेचा आढावा घेत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद...

मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक स्थगित करण्याचे आदेश

प्रभाग क्रमांक १० मधून निवडणूक लढवणारे ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानं निवडणूक स्थगित

मनमाडसह धुळ्याच्या पिंपळनेर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक २ ची देखील निवडणूक स्थगित

मुंबई विमानतळ सीमाशुल्क मोठी कारवाई

मुंबई कस्टम्स झोन–III यांनी 21 ते 24 नोव्हेंबरदरम्यान केलेल्या तपासणीत अंमली पदार्थ व सोन्याच्या तस्करीचे मोठे प्रकरण उघड.

स्पॉट व APIS प्रोफाइलिंगवर आधारित ३ NDPS प्रकरणं, यातून 10.899 किलो हायड्रोपोनिक वीड जप्त; किंमत ₹10.899 कोटी.

बँकॉकहून आलेल्या ४ प्रवाशांकडून हे सर्व आढळून आले.सर्व ४ जणांना अटक, NDPS कायदा 1985 अंतर्गत कारवाई.

विशिष्ट गुप्त माहितीवर आधारित ४ NDPS प्रकरणं, यातून 21.799 किलो हायड्रोपोनिक वीड जप्त; किंमत ₹21.799 कोटी.

कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

निवडणुकीचे चिन्ह बदलल्या वरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्या विरोधात तीव्र संताप

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विरोधी युवक क्रांती आघाडीला शिट्टी हे दिलेले निवडणूक चिन्ह बदलण्यावरून मोठा तणाव

युवक क्रांती आघाडी, राष्ट्रवादी शरद पवार गट व मनसे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक:

निवडणूक चिन्ह राजकीय दबावातून बदलल्याचा आरोप

हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

समरजीत सिंह घाटगे आणि माझी युती झाल्यामुळे विरोधी पक्षाची जी पोकळी आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी ते केविलवाना प्रयत्न करत आहेत. आमच्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढायला काही हरकत नाही पण तसे कष्ट असावे लागतात, सकाळी लवकर उठावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं, लोकांची सेवा करावी लागते, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रात्रंदिवस तळमळ लागते हे करता आलं तर ती स्पेस भरून निघेल नुसतं भाषण करून आपल्याला ही पोकळी भरून काढता येणार नाही.

आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

-राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठी जवाबदारी मिळणार असल्याचे संकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे. लोहा येथे आयोजित जाहीर सभेत तटकरे यांनी हे संकेत दिले. लोकसभे दरम्यान आम्ही सोबत काम केलोत. अपक्ष आमदार असताना त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहायचे. त्यामुळे भवितवव्याच्या कालावधीत राष्ट्रवादी त्यांना मोठी जवाबदारी देणार आहे.. ते मराठवाडा पर्यंत सीमित राहणार नसून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी पणेकाम काम करण्याची संधी मिळणार असल्याचे तटकरे यांनी जाहीर सभेत म्हणाले. तेव्हा चिखलीकर यांना मंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरु झाली आहे

पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

पुणे शहर पोलिस ठाण्यातील संख्या वाढवणार

नऱ्हे, लक्ष्मीनगर, येवलेवाडी, लोहगाव, मांजरी पोलिस ठाण्याची निर्मिती लवकरच

पुणे शहराला आणखी २ झोन मिळून २ पोलिस उपआयुक्त यांची होणार नियुक्ती

आचारसंहिता संपताच शासन निर्णय होणार

नव्याने ५ पोलिस ठाण्याची स्थापना होताच पुणे पुणे शहरात एकूण पोलिस ठाण्याची संख्या ४५ होणार

पुणे पोलिस दलातील परिमंडळाची सुद्धा फेररचना

झोन ६ आणि झोन ७ चे नवीन पोलिस उपायुक्तांची होणार नियुक्ती

भारताला संसदीय लोकशाही देणाऱ्या संविधानास यंदा ७५ पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने ठाण्यात संविधान गौरव रॅली

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने भव्य रॅली

ठाणे रेल्वे स्थानक ते कोर्ट नाका अशी संविधान गौरव रॅलीला सुरुवात

थोड्याचवेळात ऍड असीम सरोदे देखील होणार संविधान गौरव रॅलीत सहभागी

रसायनी एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत भीषण आग

रसायनी एमआयडीसतील सुप्रिया केमिकल कंपनीला भीषण आग लागली असून रसायनी येथील, खोपोली आणि खालापूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रसायनी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुप्रिया कंपनी ही केमिकल कंपनी असल्याने आगीचा भडका मोठ्या प्रमाणात आहे.धुराचे लोल मोठ्या प्रमाणात आहेत.आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आगीचे कारण अस्पष्ट आहे.

एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मै खुद की भी नही सुनता- एकनाथ शिंदे

वाशिम च्या मालेगाव मध्ये एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं असून एक तो मै कमिटमेंट करता नाही और एक बार अगर कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नही सुनता असा चित्रपटाचा डायलॉग म्हणत आपण दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं वक्तव्य केलय. तर दुसरीकडे ज्यांनी माझ्यावर टीका केली ते 110 जागा लढले,आम्ही मात्र केवळ 80 जागा लढल्या. आणि त्यातील 60 जागा जिंकल्या. काही जागांवर मागे पुढे झालं नसतं तर आमचा 100% स्ट्राईक रेट राहिला असता.

आम्ही बंड पुकारून शिवसेनेच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण सोडवण्याचं काम केलं अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेवर केली.

Pune : महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांविरोधात दुर्गा ब्रिगेडचे लाक्षणिक उपोषण

शक्ती कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा, तसेच राज्यामध्ये बालिका, तरुणी आणि महिला बाबत घडणारे गुन्हे हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी दुर्गा ब्रिगेड संघटनेने पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरस्मारक चौकामध्ये लाक्षणिक उपोषण केल आहे. राज्यात दिवसेंदिवस बालिका आणि महिलांवर लैंगिकअत्याचारांच्या घटना वाढ होत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहल नाही. याचाच निषेध नोंदवण्यासाठी दुर्गा ब्रिगेडने हे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केलं आहे.

Raigad : रायगडच्या पातळगंगा एमआयडीसाला भीषण आग

Dahisar : दहिसरमध्ये इमारतीला लागली भीषण आग

दहिसर पूर्व आनंदनगर येथील आरएमएस बिल्डिंगमध्ये आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास आग लागून एकच खळबळ उडाली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ललित साटम यांच्या घराला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच दहिसर पोलिस व फायर ब्रिगेडचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जखमी झाल्याची माहिती नाही. आगीचे कारण स्पष्ट नसून पुढील तपास सुरू आहे.

Amravati : अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेची कोअर कमिटीची बैठक

अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेची कोअर कमिटीची बैठक करण्यात आलीये. अमरावती जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने एकही उमेदवार रिंगणात नाही, अशी माहिती रवी रणा यांनी स्वतः दिली. सर्व 12 नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवाराला रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेचा बिनशर्त पाठिंबा...

pune : दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक 

पुण्यत भोरमधील नसरापूर येथे दोन सतुरासह दहशत माजवणाऱ्या तरुणाला राजगड पोलिसांनी केली अटक

politics : काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या विरोधात महायुती आक्रमक 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या विरोधात महायुतीसह शिवप्रेमी एकवटले...

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या गुजर यांच्यावर कारवाईची मागणी...

सचिन गुजर यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महायुती आक्रमक...

महायुती मधील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची घोषणाबाजी...

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर केले आंदोलन...

आंदोलनानंतर पोलिस ठाण्यात निवेदन देत सचिन गुजर यांच्यावर कारवाईची मागणी...

Raigad -  रायगड जिल्‍ह्यात शिवसेना राष्‍ट्रवादीमध्ये संघर्ष

रायगड -

० रायगड जिल्‍ह्यात शिवसेना राष्‍ट्रवादीमध्ये संघर्ष

० राष्‍ट्रवादी कॉंग्रेस सोडून शिवसेनेत गेलेल्‍या म्‍हसळयातील नगराध्‍यक्षांसह नगरसेवकांची स्‍वागत रॅलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

० मंत्री भरत गोगावले, जिल्‍हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्‍या उपस्थितीत रॅली

० म्हसळा येथे शिवसेनेत गेलेल्‍या राष्ट्रवादी नगरसेवकांचा राष्‍ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध

Ahilyanagar: काँग्रेस जिल्हाध्यक्ष अपहरण आणि मारहाण प्रकरण, श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर -

काँग्रेस जिल्हाध्यक्ष अपहरण आणि मारहाण प्रकरण

सचिन गुजर यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल

मुख्य आरोपी चंद्रशेखर ( चंदू ) आगे सह दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने पोलिसांनी केली जप्त

Nandurbar: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

नंदुरबार -

राज्यातील 600 मराठी शाळा बंद होण्याचे वृत्त

राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचं नंदुरबारमध्ये मोठं विधान

मराठी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याची सरकार काळजी घेईल

शैक्षणिक धोरणानुसार महायुतीचे सरकार राज्यात काम करतेय

Mumbai: संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या काँग्रेसच्या गौरव मार्चला सुरूवात

संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या काँग्रेसच्या गौरव मार्चला सुरूवात

काँग्रेस, सीपीआय आणि आरपीआयचे कार्यकर्ते एकत्र काढणार मार्च

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक कुर्ला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूरपर्यंत काढणार रॅली

खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वात निघणार गौरव मार्च

Nandurbar: शिवसेना शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्राची पहिली प्रचार सभेला सुरुवात

नंदुरबार -

शिवसेना शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्राची पहिली प्रचार सभेला सुरुवात

शिंदे गटाचे स्टार प्रचारक खासदार श्रीकांत शिंदे,मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नंदुरबार सभेला सुरुवात

खासदार श्रीकांत शिंदे ,मंत्री दादा भुसे, आमदार चंद्रकांत रघुवंशी ,आमदार आमश्या पाडवी यांची उपस्थिती

श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे व्यासपीठावर दाखल

Nashik: माजी आमदार निर्मला गावित यांच्या अपघातामागे कोणताही कट नाही - पोलिस

नाशिक -

- माजी आमदार निर्मला गावित यांच्या अपघातामागे कोणताही कट नाही

- कारचालकाकडून अनावधानाने अपघात झाल्याचा चौकशीनंतर पोलिसांचा खुलासा पोलिसांनी केला खुलासा

- कारचालक रामनाथ चौहानला पोलिसांनी केलीय अटक

- कार चालवताना ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबल्या गेल्याने झाला अपघात

अमरावतीच्या बडनेरा मधील जुनी वस्तीमध्ये 28 वर्षे तरुणाची निर्घृण हत्या

अमरावतीच्या बडनेरा मधील जुनी वस्तीमध्ये 28 वर्षे तरुणाची निर्घृण हत्या प्रकरण...आता पर्यत 3 आरोपी अटकेत

ऋषिकेश कापेकर तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची गर्दी

राणीच्या बागेत शक्ती वाघाचा मृत्यू

राणीच्या बागेतील (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय) शक्ती नावाच्या वाघाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंदाजे १७ वर्षीय असलेल्या या वाघाने वृद्धापकाळामुळे आलेल्या आजारांमुळे अखेरचा श्वास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राणीसंग्रहालयाने तातडीने शवविच्छेदन करून मृत्यूच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे प्राणीसंग्रहालय परिसरात शोककळा पसरली आहे. शक्ती, जो अनेक वर्षांपासून बागेतील मुख्य आकर्षण होता, त्याच्या जाण्याने वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कराडमध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

कराड -विटा मार्गावर चारचाकी कारचा आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ओमकार थोरात आणि गणेश थोरात अशी मृतांची नावे आहेत.

Political News : अंबरनाथमधील शिंदे गटाचे पदाधिकाऱ्याने शिवसेनेला केला राम राम

अंबरनाथ मधील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि ज्वेलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रुपसिंग धल यांनी शिंदे च्या शिवसेनेला केला राम राम

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित रुपसिंग धल यांनी सोमवारी केला भाजपमध्ये पक्ष प्रवेश

अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत भाजपची ताकत वाढली

शिंदेंच्या शिवसेने मध्ये रुपसिंग धल नाराज असल्याने त्यांनी सोडला शिवसेनाचा हात

Satara : साताऱ्यातील शाहूनगर या नागरी वस्तीत आढळले बिबट्याचे पिल्लू

साताऱ्यातील शाहूनगर भागात नागरीवस्तीमध्ये बिबट्याचे पिल्लू सापडले आहे.

एका अपार्टमेंट चा खाली रात्री या बिबट्याच्या पिल्लाचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर नागरिक त्या ठिकाणी जमले.

त्यानंतर वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली.वन विभागाने हे पिल्लू ताब्यात घेतले, मात्र हे पिल्लू पुन्हा मादी बिबट्याने घेऊन जाण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.

मात्र मादी बिबट्या न आल्याने आज पुन्हा हे बिबट्याचे पिल्लू मादी बिबट्या घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Maharashtra : शिंदे सेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे उबाठाच्या उमेदवाराने केले औक्षण

नगरपालिका निवडणुकीचा तापता माहोल, पक्षांतील आरोप–प्रत्यारोप आणि जोरदार मोर्चेबांधणी यामध्ये एक अनोखे, सौहार्दाचे आणि सकारात्मक राजकीय चित्र नंदुरबारमध्ये पाहायला मिळाले.

नगरपालिका प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारासाठी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रचारासाठी गेलेले शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रत्ना रघुवंशी यांच्या रॅलीला व प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.

प्रचार पथसंंचलन विरोधी पक्षाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार संगीता खंडू माळी यांच्या परिसरात गेले असताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संगीता माळी या स्वतः त्या ठिकाणी उपस्थित झाले.

निवडणुकीतील कठोर स्पर्धा बाजूला ठेवत त्यांनी मोठेपण दाखवत विरोधी पक्षाच्या उमेदवार असलेल्या रत्ना रघुवंशींना शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.तसेच आरती ओवाळत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्यात.

यावेळी यावेळी संगीता माळी यांचे पती खंडू माळी देखील उपस्थित होते.

Solapur : सोलापुरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

- सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

- प्रकाश बाविस्कर असे आत्महत्या केलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव

- दरम्यान जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास बाविस्कर कुटुंबीयांचा नकार

- उपमुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Amravati : अमरावतीच्या बडनेरा मधील जुनी वस्तीमध्ये 28 वर्षे तरुणाची निर्घृण हत्या

अमरावतीच्या बडनेरा मधील जुनी वस्तीमध्ये 28 वर्षे तरुणाची निर्घृण हत्या....

ऋषिकेश कापेकर तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची गर्दी

बांगलादेशी मुसलमान तरुनांनी सामूहिकपणे हत्या केल्याचा भाजपचे शिवराय कुलकर्णी यांचा आरोप

Jejuri : श्री क्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडेरायाची चंपाषष्टी उत्सव मोठ्या उत्सहात सांगता होती

राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गडावर दाखल होऊन मनोभावे खंडेरायाचे दर्शन घेतायेत.

श्री क्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय.

दुपारी वांग्याचा भरीत, रोडगा देवाला प्रसाद दिला जातो आणि त्यानंतर चंपाषष्टी उत्सवाची सांगता होते

Solapur: सोलापूरमध्ये 11 नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीसाठी साडेचार लाख मतदार

- जिल्ह्यातील 11 नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीसाठी साडेचार लाख मतदार.

- बार्शीत सर्वाधिक एक लाख तर दुधनी नगर परिषदेत सर्वात कमी 10 हजार मतदारांची नोंद.

- जिल्ह्यातील 11 नगरपरिषद निवडणुकीत दोन डिसेंबर रोजी होणार आहे मतदान.

- जिल्ह्यातील साडेचार लाख मतदारांपैकी दोन लाख 21 हजार पुरुष तर दोन लाख 22 हजार महिला मतदारांची नोंद,

- जिल्ह्यात 94 तृतीयपंथी मतदार त्यात 32 तृतीयपंथी बार्शी नगरपरिषद निवडणुकीत करणार मतदान.

- जिल्ह्यातील एकूण 152 प्रभागासाठी होणार मतदान.

- थेट जनतेतून असणार नगराध्यक्ष पदाला मतदान.

- जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा लागली आहे पणाला.

Dharashiv: उमरगा नगर परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गट व मनसेची युती

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा नगरपरिषद निवडणुक शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येऊन लढवत आहे.या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीय दृष्ट्या एकत्र येण महाराष्ट्रासाठी गरजेचं असल्याची भावना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केली आहे. मुंबईसह इतर महापालिकांसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक बोलणी सुरू असल्याचा देखील त्यांनी यावेळी म्हटलंय.

सह्याद्रीच्या रांगेत अनेक गावे विकासापासून वंचित असणाऱ्या गावाच्या विकासासाठी पुढाकार

पुणे शहरापासून काही किमी अंतरावर पश्चिम घाटाच्या हिरव्या कुशीत विसावलेला राजगड (पूर्वीचा वेल्हे) तालुका म्हणजे जैवविविधतेचा एक अनमोल ठेवा. याच तालुक्यात असणारा राजगड किल्ला हा मराठा साम्राज्याची पहिली राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. परिसरात वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांची समृद्ध अशी जैवविविधता आहे. जागतिक निसर्ग संवर्धन संघटनेच्या यादीतील अनेक धोक्यात असलेल्या प्रजाती येथे आढळतात. त्यामुळे जैविक, भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या याचं जतन अत्यंत गरजेचं आहे.

Nagpur: सावनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत उच्च शिक्षित महिला निवडणुकीच्या रिंगणात...

- नागपूर जिल्ह्यातील सावनेर नगरपरिषद निवडणुकीत इंजिनीअर, एमबीए,शिक्षिका असलेल्या महिला उमेदवार

- सावनेर नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून संजना मंगळे यांना उमेदवारी, संजना मंगळे या इंजिनिअर असून त्यांनी नागपूर मेट्रोतील असिस्टंट सेक्शन इंजिनिअरची नोकरी सोडून निवडणूक लढवत आहेत...

- मागील एक वर्षाचा विधानसभा निवडणूकीनंतर काँग्रेसचा गड राहिलेला नाही... महिलांसाठी लघुउद्योग महिलांसाठी विकास केंद्र आणायचे आहे. जनसेवेची संधी मिळाली असून नौकरी सोडून मला काही वाईट वाटले नसल्याच संजना मंगळे यांनी साम टिव्हीशी बोलतांना सांगितलं...

Pune: पुण्यात कोयता गँगची काढली पोलिसांनी धिंड 

पुण्यात पुन्हा कोयता गँगने पुन्हा धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे अनंत रेस्टॉरंट आणि बारवर मध्यरात्री कोयत्याची दहशत दाखवत दरोडा टाकला. या घटनेत दरोडेखोरांनी रेस्टॉरंट आणि बारच्या गल्ल्यातून 15 ते 20 हजार रुपये चोरून घेऊन गेले होते.डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत अनंत रेस्टॉरंट व बार मध्ये मास्क लावून बंद केलेले शटर जबरदस्तीने उचकटून गल्ल्यातील अंदाजे 15 ते 20 हजार रुपये जबरदस्तीने चोरून घेऊन गेले. इतकेच नव्हे तर त्यांनी हॉटेलची काच फोडत मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता या आरोपीचा शोध डेक्कन पोलिसांनी घेतला आणि त्याच परिसरात या आरोपींची धिंड काढली. आरोपींना रस्त्यावरती बेडूक उड्या मारायला ही पोलिसांनी लावल्या.

BJP: भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

हिंगोलीत पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना व भाजपमधील वाद शिगेला पोहोचला आहे, भाजप आमदार आमच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत असा गंभीर आरोप आमदार संतोष बांगर यांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर केला आहे, भाजपचे नेते पोलिसांवर दबाव आणून शंभर पोलीस घरी पाठवत आहेत, माझे पुतणे भाचे यांना नोटीसा देण्यात येत आहेत, व्यायाम शाळेची तपासणी केली आहे असे बांगर बनाले आहेत

Buldhana: नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दोन उपमुख्यमंत्र्यांच्या बुलढाण्यात ५ सभा

बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपरिषद च्या नगराध्यक्ष पदाच्या प्रचारार्थ जिल्ह्यात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन प्रचार सभा होत आहेत, बुलढाणा व सिंदखेडराजा येथे ह्या प्रचार सभा होणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तीन प्रचार सभा होत आहे, मलकापूर, चिखली व देऊळगावराजा या ठिकाणी प्रचारसभा होत आहे..

जिल्ह्यातील प्रचार शिगेला पोहोचला असल्याचे चित्र आहे

Shivsena: अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरच्या सभेत मंत्री संजय शिरसाट यांची फटकेबाजी

शिवसेनेचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेड जिल्ह्यातील भोकर मध्ये आयोजित सभेत जोरदार फटकेबाजी केली.देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यावर देखील संजय शिरसाट यांनी टीका केली. लहानपणी ऐकलं होतं , शंकरराव म्हणाले होते,नांदेडचा लंडन करू, मला नेहमी वाटायचं जाऊन नांदेड शहर पाहू.नंतर अनेक वेळा नांदेडला आलो, पण लंडन दिसलं नाही असं संजय शिरसाठ म्हणाले.

दरम्यान अशोक चव्हाण यांच्यावर देखील संजय शिरसाट यांनी टीका केली.सगळ्या एजन्सी त्यांच्याकडं,इतक्या एजन्सी घेऊन करता काय, भाकरीच खाता की नोटा खाता तुम्ही असं संजय शिरसाठ म्हणाले.इतका पैसा पाहिजे कशाला,घरातही मोठं कुटुंब नाही,हिस्से होतील असेही नाही.मी हरामाचे पैसे खात नाही. यांचा विकास कुठं.जिथं मानस राहतात तिथे विकास केला नाही. शेतात लेआऊट टाकून रस्ते केलें असे संजय शिरसाट म्हणाले. विशेष म्हणजे भोकर हा चव्हाण कुटुंबांचा पारंपरिक मतदारसंघ आहे.याच भोकर शहरात शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत,संजय शिरसाठ यांनी जाहीरपणे चव्हाण वर तोफ डागली.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज पश्चिम विदर्भात प्रचार सभा

- काल पूर्व विदर्भात प्रचार सभा घेतल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पश्चिम विदर्भात प्रचार सभा

- यवतमाळच्या वनी, पांढरकवडा, वाशिम आणि बुलडाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जाहीर प्रचार सभा

- नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जाहीर सभांचे आयोजन

Latur: क्रीडा स्पर्धेच्या नावाखाली लातूरमध्ये चार अल्पवयीन मुलींचा विनयभंग

लातूर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, अल्पवयीन मुलींना इंटरनॅशनल पातळीवर क्रीडा स्पर्धेत संधी देतो म्हणत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चार अल्पवयीन मुलींना क्रीडा स्पर्धेत संधी देण्याच्या नावाखाली मागच्या 11 महिन्यापासून सातत्याने आरोपीने अल्पवयीन मुलींशी जवळीक साधून विनयभंग केल्याच्या तक्रारी शहरातील संबंधित पोलीस ठाण्यात दाखल आहेत या अंतर्गत आरोपी विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या घटनेने शिक्षण क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Washim: वाशिममध्ये लाडक्या बहिणींचा कौल कुणाला, तब्बल १ लाख १० हजार महिला मतदानाचा बजावणार हक्क...

वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतच्या निवडणुकीत पाच ठिकाणी मिळून २ लाख २३ हजार ६५१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये तब्बल १ लाख १० हजार महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, या निवडणुकीत वाशिम जिल्ह्यात युतीतील पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत आहेत तर विरोधातील पक्ष महाविकास आघाडी मधून लढत आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांचे लक्ष आता या लाडक्या बहिणीकडे लागले असून, नेमक्या लाडक्या बहिणी आपला मताचा कौल कुणाच्या पारड्यात टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

० माणगाव नजीक कळमजे जवळ शिवशाही बस आणि सीएनजी वाहून नेणारा ट्रक यामध्ये अपघात

० अपघातात बसमधील सात प्रवासी जखमी

० अपघातात बसच मोठे नुकसान

० सीएनजी गॅस गळतीची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक थांबवली

० मुबंई गोवा महामार्गावर माणगावमध्ये दोन्ही बाजुची वरील वाहतुक ठप्प

० महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रागा

Washim: वाशिममध्ये नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी वेगाने सुरू

वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी वेगाने सुरू आहे. रिसोडमध्ये झालेल्या द्वितीय प्रशिक्षण सत्रात मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकार्‍यांना ईव्हीएम हाताळणी, मॉक पोल, सीलिंग प्रक्रिया आणि सुरक्षा प्रोटोकॉलची सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्वतः प्रशिक्षणात उपस्थित राहून तयारीचा आढावा घेतला आणि मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व नियमाधारित ठेवण्याचे निर्देश दिले.

Yewala: येवला शहर विकासाचा राष्ट्रवादी चा वचननामा प्रसिध्द

नाशिकच्या येवला नगर परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रवादी तर्फे सर्वकष ४० पानांचा वचननामा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला,गेल्या दोन दशकांपासून येवला शहर व तालूक्यात विकासाची गंगा इथून पुढे आणखी खळखळणार असून,स्वच्छ,सुंदर व प्रगतशील येवला आम्ही घडवणार असल्याच या वचन नाम्यात जाहीर करण्यात आले आहे.एकंदरीतच समीर भुजबळ यांच्या हाती असल्याने राष्ट्रावादी तर्फे जोरदार प्रचाराला लागल्याच दिसून येत आहे.

Mira road: मीरारोड येथील हटकेजवळील विशाल रेसिडेन्सीमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

मीरारोड येथील हटकेजवळील विशाल रेसिडेन्सीमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली

दुसऱ्या मजल्यावरील घर क्रमांक 201 मध्ये ही आग लागली होती. या आगीत घरातील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या संयुक्तरित्या केलेल्या प्रयत्नांमुळे आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. सध्या परिसरात परिस्थिती नियंत्रणात असून आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Nashik: घराला लागलेल्या आगीत ३ लाख रुपये जळून खाक

नाशिकच्या निफाड तालूक्यातील म्हरळगोई येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे.शेतकरी किरण घुगे हे कुटूंबासह एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले असता त्यांच्या बंद घराला अचानक आग लागल्याची घटना घडली.घुगे यांनी कांदा विक्रीतून आलेले ३ लाख रुपये घर बांधकामासाठी कपाट ठेवले होते.मात्र लागलेल्या आगीत संपुर्ण तीन लाखाची रक्कमेसह घरातील सामान जळून खाक झाल्याने शेतकरी घुगे कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.दरम्यान आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

Jalgaon: पहूर- जामनेर रस्त्यावर मालवाहू वाहने आणि दुचाकीचा अपघात

पहूर- जामनेर रस्त्यावर पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मालवाहू वाहन व दुचाकी अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे

*अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश सुरेश लोखंडे, अजय फकिरा साबळे आणि रवी सुनील लोंढे अशी मयत चारही तरुणाची नावे आहेत असून चारही मृत जामनेर शहरतील रहिवासी आहे.

मालवाहू गाडीचा चालक जुबेर कुरैशी हा जखमी झाला आहे .

पहूर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जामनेर शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

*रात्री सुमारास चौघे तरुण जामनेरकडे येत असताना पिंपळगावजवळील वळणावर जामनेरहून पहूरकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराला

२९ नोव्हेंबरला एकनाथ शिंदे चिपळूण दौऱ्यावर

शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेणार रोड शो

एकनाथ शिंदे जिल्ह्यातील इतर ठिकाणी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी सुद्धा घेणार सभा

प्रचाराच्या शेवटच्या टप्याकडे शिवसेनेनी केलं लक्ष्य केंद्रीत

Akola: अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ अजित पवारांची तोफ धडाडणार'

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये येतायेत. अकोटमधील प्रचारसभेत ते अकोला जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि एका नगररंचायतीसाठी प्रचार करणारायेत. अकोट, तेल्हारा आणि हिवरखेड नगरपालिकांसाठी राष्ट्रवादी उमेदवारांना या सभेचा मोठा फायदा होण्याच्या उद्देशाने अजित पवार अकोटात योतायेत. अकोटमधील बस स्थानकासमोरील नेहरू मैदानावर सकाळी 10 वाजता त्यांची जाहीर सभा होणारेय. जिल्ह्यातील पक्षाचे सर्वच उमेदवार या सभेला उपस्थित असणारायेत. अकोटमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूजम्मा यांच्या पत्नी गाजीयाबानो बद्रूजम्मा या पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेयेत. या सभेला अजित पवार यांच्या समवेत पक्षाचे आमदार आणि स्टार प्रचारक अमोल मिटकरीही उपस्थित असणार आहेत. अकोटची सभा आटोपून अजित पवार बुलडाणा जिल्ह्यातील खामगावला पक्षाच्या सभेसाठी जाणारायेत. अकोटमधील सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केलीये.

Amravati: लग्नानंतर अर्ध्या तासातच नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; अमरावतीतील घटना

अमरावतीत वरुड तालुक्यातील पुसला मध्ये लग्नसोहळ्यात हृदयद्रावक घटना.लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..

अमोल गोड असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव;चक्कर येताच मंडपात खळबळ, पाहुण्यांची झाली धावपळ.

तातडीने रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं

लग्नाचा आनंद क्षणात दुःखदायक शोकांतिका ठरला

वर आणीबवधूच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; वरुड तालुक्यातील पुसला गावात शोककळा पसरली.

कोतवाल म्हणून कार्यरत असलेल्या अमोल गोड यांचा दुर्दैवी अंत.

भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक धक्कादायक विधान केला आहे सिद्धार्थ नगर परिसरात आमदार संतोष बांगर शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गेले होते यावेळी त्यांनी जाहीर सभेत भाजपच्या आमदाराने माझ्या घरात शंभर पोलीस पाठवून तपासणी केली असा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला आहे, मध्यरात्री मुलं बाळ झोपले असताना पोलीस सर्च वॉरंट घेऊन आल्याचे बांगर म्हणाले आहेत, हिंगोली भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी हे पोलीस पाठवले असल्याचा थेट आरोप आमदार बांगर यांनी केला आहे माझ्या घरातील फ्रिज कपडे देखील पोलिसांनी उचकाटून पाहिल्याचं बांगर म्हणाले आहेत , विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस 28 तारखेला हिंगोलीत जाहीर सभा घेत आहेत त्या आधीच संतोष बांगरांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

तळेगावात  उमेदवार संतोष दाभाडे यांच्या प्रचाराला आला वेग

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहयाला सुरुवात झाली आहे. तळेगाव मध्ये महायुती च्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी संतोष दाभाडे हे कमळ घेऊन उभे आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपचेच बंडखोर अपक्ष उमेदवार किशोर भेगडे आपलं नशीब आजमावत आहे. दरम्यान तळेगाव दाभाडे मध्ये लोकशाही जिवंत ठेवायची आहे. इथे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे ती संपवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभं असल्याचं मत अपक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऍड. रंजना भोसले यांनी मत व्यक्त केला आहे.

दोघांच्या वादामुळे माझा सॅंडविच नक्कीच होतो, असे रक्षा खडसे

एकीकडे नाथाभाऊ सासरे आहेत, तर दुसरीकडे मंत्री गिरीष काका वडिलांसारखे आहेत, दोघांच्या वादामुळे माझा सॅंडविच नक्कीच होतो, असे रक्षा खडसे यांनी म्हटल आहे.

एकनाथ खडसे व मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्व राज्याला परिचित आहेत...

मुक्ताईनगर भाजपचा एक गट शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना मदत करत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर रक्षा खडसे बोलत होत्या.

माझा विषय सोडा भाजपची ताकद होती म्हणून त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील निवडून आले

भाजपच्या मतांवरतीच मुक्ताईनगर मध्ये शिवसेना शिंदे आमदार निवडून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com