Income Tax Raid : आयकर विभागाचे सराफा बाजारात छापे; अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील ७० टक्के उलाढाल बंद

Amravati News : आयकर विभागाच्या पथकाने एकता ज्वेलर्सच्या दुकानावर १५ मे रोजी छापेमारी करत तपासणीला सुरवात. विशेष म्हणजे एकता ज्वेलर्समध्ये अधिकाऱ्यांनी संगणक तसेच कागदपत्रांची, वहिखात्याची तपासणी केली
Income Tax Raid
Income Tax RaidSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: अकोला, परतवाडा येथील एकता ज्वेलर्सच्या दुकानावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सराफ दुकानावर छापा टाकल्याने सराफा बाजार वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधितांचे घरासह ज्वेलर्समध्ये तपासणी सुरू आहे. दरम्यान अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील किमान ७० टक्के उलाढाल बंद पडली आहे. 

आयकर विभागाच्या पथकाने एकता ज्वेलर्सच्या दुकानावर १५ मे रोजी छापेमारी करत तपासणीला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे गुरुवारला एकता ज्वेलर्समध्ये अधिकाऱ्यांनी संगणक तसेच कागदपत्रांची, वहिखात्याची तपासणी केली. दरम्यान १५ मे रोजी नागपुर शहरातील काही सराफा ज्वेलर्समध्ये आयकर विभागाने घाड टाकल्याने विदर्भासह अमरावती विभागातील सराफा बाजार हादरला आहे. 

Income Tax Raid
Tuljapur: जेवला अन् झोपला, रात्रभर वेदनेनं विव्हळत; एकुलत्या एक मुलाचा झोपेतच हार्ट ॲटॅकनं मृत्यू

१४७ पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तपासणी 

आयकर विभागाने एका ज्वेलर्सच्या अमरावती, परतवाडा, यवतमाळ, अकोला येथील ज्वेलर्सवर एकाचवेळी धाड टाकली. यासह तिन्ही शहरातील इतर ज्वेलर्सवर देखील धाडी घालण्यात आल्या. यासह आयकर विभागाने अकोला शहरातील पूनम ज्वेलर्स, अग्रवाल ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स यांच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. मुंबई, नागपुर, संभाजीनगर आयकर विभागातील १४७ पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समावेश असलेल्या विविध पथकांची अद्यापही ज्वेलर्समध्ये तपासणी सुरू आहे.

Income Tax Raid
Nandurbar Water Scarcity : थेंब थेंब पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष; नाल्यातून दूषित आणि खराब पाणी पिण्याची आदिवासी बांधवांवर वेळ

७० टक्के उलाढाल बंद 

दरम्यान सर्व ज्वेलर्समधील रक्कम, डिजिटल डेटा, खरेदी-विक्रीचे बिल, बॅकींगसह इतर सर्व प्रकारच्या व्यवहाराची कागदपत्रे तपासणे सुरू आहे. आयकर विभागाच्या छापेमारीमुळे अमरावतीमधील सराफ व्यापाऱ्यांना तर एवढी धडकी बसली आहे की, बहुतांश सराफा व्यापाऱ्यांनी आपले दुकान व मोबाइल बंद केले आहेत. यामुळे सद्यस्थितीला विभागातील पाचही जिल्ह्यातील किमान ७० टक्के सराफा बाजाराची उलाढाल बंद आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com