Sakshi Sunil Jadhav
साडी हा भारतीय महिलांचा सदाबहार पोशाख. खास प्रसंग असो, लग्नसमारंभ किंवा फेस्टिवल साडी कंटाळवाणी कधीच वाटत नाही. पण साडीचा खरा लुक ब्लाऊजमुळे उठून दिसतो. म्हणूनच ब्लाऊजची फिटिंग, डिझाइन आणि स्टाईल याकडे महिलांचा जोर वाढला आहे.
सेलिब्रिटीजसारखा परफेक्ट लुक हवा असेल, तर ब्लाऊज स्टिचिंग करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट दिसण्यासाठी पॅडेड ब्लाऊज उत्तम असतात. आपल्या ब्रा साइजप्रमाणेच कप निवडा, यामुळे ब्लाऊजला योग्य शेप मिळतो.
काही फॅब्रिक वॉश झाल्यानंतर आकसतात. त्यामुळे सिलाई करण्यापूर्वी फॅब्रिकचे नेचर जाणून घ्या. अशा कपड्यांची सिलाई थोडी सैल ठेवावी.ब्रेस्ट एरियाची फिटिंग परफेक्ट असलीच पाहिजे.
हैवी साडीला स्ट्राइप्ड पॅटर्न ब्लाऊज खूपच एलिगंट दिसतो. हा पॅटर्न अनेक अभिनेत्रींचा फेवरेट आहे.
आजकाल ऑफ-शोल्डर, कोल्ड स्लीव्ह्ज, मिड-लेंथ स्लीव्ह्ज मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत. हे सर्व वयाच्या महिलांना शोभून दिसतात.
कॉटन किंवा सिंपल सॉलिड फॅब्रिकचा ब्लाऊज देखील लेस लावल्याने आकर्षक दिसतो. नेकलाइन किंवा बॉर्डरवर लेस लावल्यास लुक खुलतो.
ब्लाऊजचे मोजमाप बरोबर न घेतल्यास फिटिंग बिघडते. त्यामुळे शोल्डर, बस्ट, अंडरबस्ट, स्लीव्ह आणि लांबी यांची मोजमापे अचूक घ्यावी.
फिगरला साजेश्या स्लीव्ह्ज निवडल्यास ब्लाऊज परफेक्ट दिसतो. चुकीच्या स्लीव्ह पॅटर्नमुळे संपूर्ण लुकवर परिणाम होतो.