ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling: आयटीआर फाइल करताना 'या' चुका कधीच करु नका; येईल आयकर विभागाची नोटीस

ITR Filling 2025: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना नेहमी काळजी घ्यायची असते.आयटीआर फाइल करताना दोन कागदपत्रे खूप गरजेची असतात. त्याशिवाय तुम्ही आयटीआर भरु शकत नाही.

Siddhi Hande

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख समोर आली आहे. आता नोकरदार वर्ग आयटीआर फाइल करत आहेत. दरम्यान, आयटीआर भरण्यासाठी अजून बरेच दिवस आहेत तरीही आतापासूनच आयटीआर भरण्यास सुरुवात झाली आहे. आयटीआर फाइल करण्याची मुदत वाढू शकते, असं अनेकांना वाटतं. परंतु तरीही तुम्ही आयटीआर फाइल करण्यास उशिर करु नका. त्यामुळे तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.

आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. यापूर्वी तुम्हाला आयटीआर फाइल करायचा आहे.जर तुम्ही यानंतर आयटीआर फाइल केला तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. याचसोबत दंडासोबत व्याजदेखील भरावे लागू शकते. त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला रिफंड मिळण्यासदेखील अडचण येऊ शकते. यामुळे मुदतीपूर्वी आयटीआर भरल्याने अनेक फायदे होतील. यामुळे तुमचा रिफंड लवकरच अकाउंटमध्ये जमा होईल.

चुकीची माहिती भरु नका

आयटीआर फाइल करताना नेहमी खरी माहिती भरा. जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमचा आयटीआर रिजेक्ट होऊ शकतो. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतो. आयटीआर भरण्यापूर्वी तुमच्याकडे दोन कागदपत्रे असणे गरजेचे आहे. पहिले कागदपत्र म्हणजे Form 26AS आणि दुसरा म्हणजे डॉक्युमेंट अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS) असावे. हे दोन्ही कागदपत्रे खूप आवश्यक आहेत.

Form 26AS काय आहे?

Form 26AS तुम्हाल इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर मिळणार आहे. यामध्ये तुमच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनची माहिती असते. यामध्ये जर तुम्ही कोणती प्रॉपर्टी खरेदी करत असेल त्याचे पेमेंट केले असेल तर ट्रान्झॅक्शन Form 26AS मध्ये दिसेल. याचसोबत तुमच्या टीडीएस आणि टीसीएसची माहिती असेल. याचसोबत या फॉर्ममध्ये रिफंडचीदेखील सर्व माहिती असते.

AIS काय आहे?

अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्येदेखील तुमच्या व्यव्हरांची सर्व माहिती असते. याचसोबत सेव्हिंग अकाउंटमध्ये व्याजदराची माहिती, तसेच शेअर्समधून मिळालेला डिविडेंड याबाबत माहती दिलेली असते. तुम्ही परदेशातील कोणत्या अकाउंटमध्ये पैसे पाठवलेत की नाही याचीदेखील सर्व माहिती असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव आमने-सामने

Jio OTT Plans: स्वस्तात धमाल! जिओचे ३ स्वस्त OTT प्लॅन, फक्त १०० रुपयांत ९० दिवस एंटरटेनमेंट

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

SCROLL FOR NEXT