ITR Filling: आता अवघ्या काही मिनिटांतच फाइल करता येणार आयटीआर, डिजिटल फॉर्म 16 मुळे काम होणार सोपे

Digital Form 16 Update for ITR Filling: आयटीआर फाइल करणे आता आणखी सोपे होणार आहे. डिजिटल फॉर्म 16 मुळे तुम्ही काही मिनिटांतच आयटीआर भरू शकणार आहात.
 ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On

मे महिना सुरु आहे. आता सर्व नोकरदारांनी आयटीआर फाइल करण्यास सुरुवात केली आहे. आयटीआर फाइल करण्यास वेळ लागतो.त्यामुळे आतापासूनच सुरुवात करण्यात आली आहे. परंतु आता तुम्हाला इन्कम टॅक्स फाइल करण्यासाठी अवघे काही मिनिट लागणार आहे. यासाठी आयकर विभागाने डिजिटल फॉर्म सुरु केला आहे. यामुळे नोकरदार वर्गाचे काम खूप सोपे होणार आहे. (ITR Filling Process)

नोकरदार वर्गाला आयटीआर फाइल करण्यासाठी फॉर्म 16 गरजेचे असते. यामध्ये कर्मचाऱ्याची सलरी, टीडीएस, डिक्ंशस याबाबत माहिती असले. त्यामुळे हा फॉर्म जारी झाल्यानंतर नोकरदार वर्ग आयटीआर फाइल करु शकतात. आता एम्प्लॉयर्सने कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल फॉर्म 16 जारी केला आहे.

 ITR Filling
ITR U Filling: शेवटची संधी, ३ दिवसात अपडेटेड आयटीआर भरा, अन्यथा ५० टक्के अतिरिक्त टॅक्स लागणार

TRACES पोर्टलवरुन जनरेट होणार फॉर्म (Form 16)

डिजिटल फॉर्म 16 थेट TRACES पोर्टल जनरेट होतो. हा फॉर्म आतापासून डिजिटल फॉर्मॅटमध्ये असणार आहे. यामध्ये तुमची सर्व माहिती मिळणार आहे. ट्रेडिशनल फॉर्म 16ला फॉर्म 26AS आणि 26AASशी मॅच करुन पाहावे लागते.

फॉर्म अपलोड करताना सर्व माहिती भरली जाणार (Digital Form 16 Update)

आता नोकरी करणारे लोक सोप्या पद्धतीने आयटीआर फाइल करु शकणार आहेत. तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइटवर जावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार योग्या आयटीआर फॉर्म निवडावा लागेल. यानंतर डिजिटल फॉर्म 16 अपलोड करावा लागेल. हा फॉर्म अपलोड करताच सर्व तुमची सर्व माहिती आपोआप अपलोड होणार आहे. यामध्ये तुमचे उत्पन्न, टीडीएस समावेश होणार आहे.

 ITR Filling
Income Tax Raid : आयकर विभागाचे सराफा बाजारात छापे; अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील ७० टक्के उलाढाल बंद

टॅक्स कॅलक्युलेशन (Tax Calculation)

फॉर्म १६ डिजिटलमुळे टॅक्स कॅल्क्युलेशनदेखील सोपे होणार आहे. यामुळे आयटीआर फाइल करताना लागणारा वेळदेखील कमी होणार आहे. याचसोबत रिटर्नची प्रोसेसिंग लवकरात लवकर होणार आहे.

 ITR Filling
ITR Filling: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर फाइल करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठे नुकसान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com