Success Story 
बिझनेस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! १६ वेळा सरकारी नोकरी करण्याची संधी धुडकावली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS तृप्ति भट्ट यांचा प्रवास

Success Story of IPS TrIpti Bhatt: आयपीएस तृप्ति भट्ट या नेहमीच त्यांच्या दमदार कामगिरीमुळे चर्चेत असतात. त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी १६ सरकारी नोकऱ्या धुडकावल्या आहेत.

Siddhi Hande

प्रशासकीय सेवेत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अनेकांना सरकारी नोकरी हवी असते. यासाठी स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. स्पर्धा परीक्षेत अनेकदा अपयश येते. परंतु काहीजणांना खूप कमी वयातच यश मिळते. असंच यश आयपीएस तृप्ति भट्ट यांना मिळाले. त्यांनी जवळपास १६ सरकारी नोकरी धुडकावल्या आणि स्वतःचे आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

अनेकदा परिस्थितीमुळे आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही. परंतु परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्यात असते. असंच काहीसं तृप्ति यांनी केले.

तृप्ति यांचे शिक्षण (IPS Trupti Bhatt Education)

तृप्ति या मूळच्या उत्तराखंडमधील अल्मोडा येथील रहिवासी.तृप्ति यांनी अल्मोडा येथील बीरशेबा सीनियर सेकंडरी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. केंद्रीय विद्यालयातून १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पंतनगर विद्यापीठातून इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली.

तृप्ति यांनी धुडकावल्या १६ सरकारी नोकऱ्या

इंजिनियरिंग झाल्यानंतर तृप्ति यांनी नॅशनल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर काम केले. तृप्ति यांना इस्त्रोमध्ये नोकरी मिळाली होती.याचसोबत त्यांनी १६ सरकारी नोकरी धुडकावल्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी केले.

आयुष्याचा टर्निंग पॉइंट

तृप्ति या नववीत असताना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भेटल्या होत्या. त्याचवेळी त्यांना प्रेरणा मिळाली. देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. २०१३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात तृप्ति यांनी यूपीएससी परीक्षेत १६५ रँक प्राप्त केली. त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला.तृप्ति या स्पोर्ट्स खेळतात. त्यांना मॅरेथॉन, बॅडमिंटन या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : नारळी पौर्णिमेच्या शुभ दिवसाला आयुष्यातील अडचणी दूर होणार; ५ राशींच्या लोकांची आर्थिक भरभराट होईल

Shukra Gochar: 27 ऑगस्टला मित्राच्या नक्षत्रात प्रवेश करणार शुक्र; 'या' राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार

Todays Horoscope: आजच्या 'या' राशींच्या व्यक्तींना विनाकारण फटका बसण्याची शक्यता, वाचा राशीभविष्य

Police Officers Promotion: राज्यातील १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश; वाचा संपूर्ण लिस्ट

Bogus Voter Scam: राहुल गांधींकडून पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड; सांगितली नोंदणीची मोडस ऑपरेंडी

SCROLL FOR NEXT