
अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर खूप मेहनत घ्यावी लागते. जरी तुम्हाला अपयश आले तरीही त्याचा सामना करता यायला हवा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नृवित्ती सोमनाथ. त्यांना यूपीएससी परीक्षेत एकदा दोनदा नाही तर सलग तीन वेळा अयश आले परंतु या अपयशामुळे न डगमगता त्यांनी पुन्हा प्रयत्न केले.
निवृत्ती सोमनाथ यांचा प्रवास (Success Story Of Of Nivrutti Somnath)
निवृत्ती सोमनाथ आव्हाड यांनी खूप मेहनत करुन हे यश मिळवलं आहे. निवृत्ती सोमनाथ यांनी यश मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याचेच फळ त्यांना मिळाले. निवृत्ती सोमनाथ हे मूळचे नाशिकच्या गुळवंच गावचे रहिवासी.
निवृत्ती आव्हाड यांनी आपल्या मामाच्या गावी सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी न्यू इंग्लीश स्कूल येथून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सिन्नर येथील मविप्र कॉलेजमधून विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटमधून इंजिनियरिंग पदवी प्राप्त केली.
निवृत्ती आव्हाड यांचे आईवडील शेतकरी आहेत. फारसे शिकलेले नसतानाही त्यांनी आपल्या मुलाला शिकण्याचा ध्यास घेतला. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर निवृ्त्ती यांनी तीन वर्षे नोकरी केली. नोकरी करताना त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार केला.
निवृत्ती सोमनाथ यांनी एमपीएससी परीक्षा देऊन कक्ष अधिकारी झाले. परंतु त्यांना आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा तयारी केली. त्यांनी २०१६ मध्ये यूपीएससी क्रॅक केली. त्यावेळी त्यांची महसूल विभागात आयआरएस म्हणून नियुक्ती झाली. तरीही त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होती. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि ते ५ व्या प्रयत्नात आयएएस अधिकारी बनले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.