नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांचा युनिक आयडी देण्यात येणार आहे.केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी दिला जाणार आहे.
अपार आयडीमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जाणार आहे. हा १२ अंकी नंबर असणार आहे.वन नेशन वन स्टुडंटअंतर्गत हा अपार आयडी दिला जाणार आहे.यामुळे शालेय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने साठवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सर्व माहिती कधीही ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.
अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती ऑनलाइन पद्धतीने स्टोर करता येणार आहे.
अपार आयडी तयार झाल्यानंतर डीजी लॉकरला जोडला जाणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील लक्ष्य आणि परीक्षेचे निकाल तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठवता येणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या माहितीचे ग्राफिकल अॅनालिसिस करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व माहिती तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध होईल.
अपार आयडी कार्डमुळे तुमची सर्व माहिती ऑनलाइन स्वरुपात असणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी फायदा होणार आहे.
अपार आयडी कार्डमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, फोटो, एज्युकेशन लोन, स्कॉलरशिप, विद्यार्थ्यांच्या स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीज, अवॉर्ड याबाबत सर्व माहिती दिलेली असणार आहे. अनेकदा काही विद्यार्थी आपली शाळा बदलतात. त्यावेळी या अपार नंबरमुळे तुम्हाला मदत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.