
यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करुन आयएएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु हे स्वप्न पूर्ण करताना इतर अनेक स्वप्ने अपूर्ण राहतात. परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही वयाची गरज नसते. हे अभिषेक सिंह यांनी दाखवून दिले. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केला.
परीक्षा पास केल्यानंतर ते आयएएस म्हणून कार्यरतदेखील झाले.परंतु त्यांचे अभिनेता होण्याचे स्वप्न होते.त्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Success Story Of Ex IAS Abhishek Singh)
आयएएस अभिषेक सिंह (IAS Abhishek Singh) यांनी आपल्या आयुष्यातील एक अनुभव सांगितला होता. त्यांना कॉलेजमध्ये असताना प्रेमात धोका मिळाला होता. यामुळे ते पूर्णपणे खचले होते. त्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०११ मध्ये यूपीएससी परीक्षेत ९४ रँक प्राप्त केली.
अभिषेक सिंह यांनी २०२३मध्ये आयएएस पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी आपली इच्छा आणि स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. अभिषेक सिंह यांनी १९४६: डायरेक्ट अॅक्श डे चित्रपटात काम केले आहे. याचसोबत त्यांनी बादशाहसोबत अनेक म्युझिक व्हिडिओदेखील केले आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.