परिस्थिती कशीही असो त्यावर आपल्याला मात करता यायला हवी. नेहमी परिस्थिती आपल्याला हवी तशी नसते त्यामुळे कधीच हार मानायची नाही. तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल.असेच प्रयत्न आयपीएस सफीन हस यांनी केले.गरीब परिस्थितीवर मात करत त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांच्या या यशामुळे सर्वांनाच प्रेरणा मिळाली आहे.
आयपीएस सफीन हसन हे मूळच्या गुजरातच्या पालनपुरचे रहिवासी. त्यांचे आई-वडील दोघेही मजुरी करतात. मजुरी करुन त्यांनी आपल्या मुलांना मोठे केले. त्यांनी आई जेवण बनवायचे काम करायचे तर वडील वीट भट्टीवर कामाला जायचो. याचसोबत संध्याकाळी अंडी विकायचादेखील स्टॉल लावायचे.
सफीन यांचे बालपण खूप खडतर परिस्थितीत गेले. त्यांच्या आईवडिलांनी मात्र मुलाच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी खूप मेहनतीने मुलाला शिकवले. सफीनने बीटेकचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांचे फक्त एक लक्ष्य होते ते म्हणजे यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक करणे.
सफीन हसन हे शाळेत खूप हुशार होते. त्यांची ११वी आणि १२वीची फी माफ केली होते. सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याची इच्छा त्यांची शाळेत असतानाच निर्माण झाली होते. त्यांच्या शाळेत एकदा कलेक्टर आले होते. त्यांनीच सफीन यांना प्रेरणा दिली.
२२ व्या वर्षी IPS
सफीन यांचा यूपीएससी मेन्स परीक्षेच्या सकाळी अपघात झाला. त्यांच्या हाताला दुखापत झाली. परंतु त्यांनी एका हाताने पेपर लिहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०१७मध्ये यूपीएससी परीक्षेत ५१७ रँक प्राप्त केली. त्यांनी वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.