Success Story: जिद्द! सलग ३३ वेळा अपयश, शेवटी UPSC क्रॅक केलीच, IPS आदित्य कुमार यांचा प्रवास

Success Story Of IPS Aditya Kumar: आदित्य कुमार यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. सलग ३३ वेळा स्पर्धा परीक्षेत अपयश आले तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाही.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी (UPSC) परीक्षा देण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही मन लावून मोठ्या जिद्दीने प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु असं म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. असंच काहीसं आदित्य कुमार यांच्यासोबत झालं. त्यांना एकदा दोनदा नाही तर तब्बल ३३वेळ अपयश आले परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांची ही जिद्द त्यांना यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेली.

Success Story
Success Story: दिवसभर मोबाईल कव्हर विकायचा, अन् रात्रभर अभ्यास; भाजी मंडईत काम करणाऱ्या मुलाने क्रॅक केली NEET

सलग ३३ परीक्षांमध्ये नापास ()

आदित्य कुमार हे मूळचे राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातील अजीतापुरा गावातील रहिवासी. त्यांचा हा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना ३३ स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आले. परंतु मेहनत करणाऱ्याला यश हे मिळते.तसंच यश आदित्य कुमार यांना मिळालं. त्यांना २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली आणि ते आयपीएस अधिकारी बनले.

आदित्य यांनी हिंदी माध्यमातून शिक्षण घेतले. १२वीनंतर त्यांनी सरकारी नोकरीसाठी तयारी करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी बँक, AIEEE, KVS अशा ३३ परीक्षा दिल्या. सलग अपयश आले. परंतु त्यांनी हार मानली नाही.

तीनवेळा यूपीएससी परीक्षेत अपयश

२०१३ मध्ये त्यांनी दिल्लीला येऊन लोक सेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. त्यांना पहिल्या तीन प्रयत्नात अपयश आले. त्यांना २०१४, २०१५,२०१६ मध्ये अपयश आले. सलग तीन वेळा अपयश येऊनही त्यांनी प्रयत्न सोडले.

Success Story
Success Tips : आयुष्यात यश मिळवण्याचे हे नियम तुम्हाला माहितीयेत का?

आदित्य कुमार यांनी स्वतः वर विश्वास ठेवा आणि प्रयत्न सुरु ठेवले. त्यांनी आपल्यात स्ट्रॅटेजीत बदल केला. त्यांना २०१७ मध्ये ६३० रँक प्राप्त झाली. सातत्य, धैर्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकतात, असं आदित्य कुमार यांचं मत आहे.

Success Story
Success Story: आधी डॉक्टर झाली, संसार अन् मुलाला सांभाळून दिली UPSC; दुसऱ्याच प्रयत्नात यश; डॉ. प्रगती वर्मा यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com