
यूपीएससी परीक्षा द्यायची म्हटल्यावर दिवसरात्र मेहनत करावी लागते. १२-१२ तास अभ्यास करावा लागतो. दरवर्षी लाखो तरुणांचे आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न असते. अनेकांना ते जमत नाही. परंतु काही विद्यार्थी असे असतात की ते कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक करतात. याच आयएएस ऑफिसरपैकी एक नाव म्हणजे सलोनी वर्मा.
सलोनी वर्मा या यूपीएससी देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांना २०२० मध्ये यूपीएससी सीएसईमध्ये ७०वी रँक प्राप्त केली आहे.
कोण आहेत सलोनी वर्मा?
सलोनी वर्मा या मूळच्या झारखंडमधील जमशेदपूरच्या रहिवासी आहेत. त्यांनी आपले शिक्षण दिल्लीत पूर्ण केले. दिल्लीत त्यांनी १०वी आणि १२वीची परीक्षा दिली. त्यानंतर ग्रॅज्युएशनदेखील केले. पदवी परीक्षा पास केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.
कोणत्याही कोचिंगशिवाय यूपीएससी क्रॅक
सलोनी वर्मा या खूप हुशार आहेत. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा दिली. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी ७०वी रँकदेखील प्राप्त केली.
सेल्फडी स्टडी
सलोनी वर्मा यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितले की, परीक्षेत पास होण्यासाठी सर्वात आधी अभ्यासक्रम समजून घेणे खूप गरजेचे आहे. त्यानुसार तुम्ही परीक्षेच्या तयारीचे शेड्युल बनवा. यानंतर वेळेचं मॅनेजमेंट करा. यानंतर तुम्ही यूपीएससी परीक्षेची चांगली तयारी करु शकणार आहात.
सलोनी यांनी विद्यार्थ्यांना हा सल्ला दिला की, परीक्षेत पास होण्यासाठी स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची असते. योग्य स्ट्रॅटेजी आणि शेड्युलनुसार तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. याच काळात तुम्ही रिविजन आणि लिहण्याचीही प्रॅक्टिस करावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.