Income Tax Refund Saam Tv
बिझनेस

Income Tax Refund: इन्कम टॅक्स विभागाकडून रिफंड कमी आलाय? काय कराल? जाणून घ्या सविस्तर

Income Tax Refund News: इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर आता रिफंड कधी येणार असा प्रश्न करदात्यांना पडला आहे. आयटीआर फाइन केल्यानंतर सामान्यतः ३-४ आठवड्यात रिफंड करदात्यांच्या खात्यात जमा होतो.

Siddhi Hande

देशातील कोट्यवधी करदात्यांनी आयकर रिटर्न फाइल केला आहे. आयकर रिटर्न फाइल करुन आता १०-१५ दिवस झाले आहेत. त्यामुळे आता आयकर रिफंड कधी येणार याकडे संपूर्ण करदात्यांचे लक्ष लागले आहे. सामान्यतः आयकर रिटर्न फाइल केल्यानंतर ३-४ आठवड्यांमध्येल करदात्यांच्या अकाउंटला रिफंडचे पैसे येतात. (Income Tax Refund)

करदात्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट रिफंड तुमच्या अकाउंटला जमा करते. परंतु जर तुम्ही जास्त रिटर्न भरला असेल तरच करदात्यांना रिफंड मिळतो. इन्कम टॅक्स फाइल करताना करदात्यांच्या टॅक्सचे कॅलक्युलेशन केले जाते.आयटीआर फाइल करताना करदात्यांनी किती कर भरला आहे, याची माहिती मिळते.त्यानंतरच आयटीआर प्रक्रियेची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळते.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कलम १४३(१)अंतर्गत करदात्यांना रिटर्न भरण्याच्या प्रोसेसची सर्व माहिती मिळते.ही माहिती आयकर विभाग ईमेलवर पाठवते. तसेच इन्कम टॅक्स फायलिंग वेबसाइटवर लॉग इन करुन तुम्ही आयकर रिटर्नचा स्टेट्‍स चेक करु शकतात. या प्रक्रियेत तुमची टॅक्स लायबिलिटी (Tax Liability) आणि टॅक्स रिफंडची सर्व माहिती ई-मेलद्वारे दिली जाते. जर तुमचा इन्कम टॅक्स रिफंड हा कमी आला आणि तुम्हाला जास्त रिफंड येण्याची अपेक्षा असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम १५४ अंतर्गत रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट फाइल करु शकतात.

करदाते हे ई-फायलिंग वेबसाइटवरुन टॅक्सपेयर्स रेक्टिफिकेशन रिक्वे्ट (Rectification Request) करु शकतात. याबाबत ८ ऑगस्ट रोज इन्कम टॅक्स विभागाने माहिती दिली आहे.त्यामुळे जर तुमचा आयकर रिफंड हा कमी आला तर तुम्ही आयकर विभागाला रिक्वेस्ट पाठवून माहिती मिळवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

Maharashtra Live News Update: जयसिंगपूरमध्ये 24 वी ऊस परिषद पार, १८ ठराव पास

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा मोफत मिळतात?

SCROLL FOR NEXT