Income Tax Refund: इन्कम टॅक्स रिफंड खात्यात कधी जमा होणार? पॅन कार्डच्या मदतीने ऑनलाइन चेक करा रिफंड स्टेटस; या स्टेप्स करा फॉलो

How To Check Income Tax Refund Status: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मुदत संपली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न स्टेटस तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
Income Tax Refund
Income Tax RefundSaam Tv
Published On

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख काल म्हणजेच ३१ जुलै होती. त्यामुळे आता करदात्यांना आयटीआर फाइल करता येणार नाही. आयटीआर फाइल करण्यासाठी त्यांना दंड भरावा लागू शकतो. ज्या लोकांना आयटीआर फाइल केला आहे. त्यांना रिफंड मिळण्याची अपेक्षा आहे. हा रिफंड करदात्यांच्या अकाउंटला कधी जमा होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्राप्तिकर विभाग परतावा तुमच्या अकाउंटला कधी पाठवणार? रिफंड आला की नाही हे कसं चेक करायचं, याची संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

परतावा कधीपर्यंत अकाउंटला जमा होईल?

सर्वप्रथम सर्व करदात्यांना आपल्या पॅन कार्डच्या नावाची आणि बँक अकाउंटवरील नाव सारखे असणे गरजेचे आहे. इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसद्वारे प्रमाणिक केलेल्या बँक खात्यांमध्येच परतावा जमा केला जातो. जोपर्यंत करदात्याने त्यांच्या रिटर्न व्हेरिफिकेशन केले जात नाही तोपर्यंत परताव्याची प्रक्रिया सुरु होत नाही. करदात्यांच्या खात्यात परतावा जमा होण्यासाठी चार ते पाच आठवडे लागतात.

Income Tax Refund
ITR Filling: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी, ITR फाइल करण्याची मुदत वाढणार का? प्राप्तिकर विभागाने दिलं उत्तर

आयटीआर रिटर्न फाइल केल्याच्या तारखेनंतर १५ ते ४५ दिवसांनी तुमच्या अकाउंटला दिवस लागणार आहे. ITR-V फॉर्मसह ऑफलाइन पडताळणी केली तरच हा कालावधी वाढू शकतो. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यांनुसार, ४-५ आठवड्यांच्या आता करदात्यांच्या खात्यात परतावा जमा केला जातो. तुम्ही तुमच्या खात्यात परतावा जमा होणार की नाही, किंवा त्याबद्दलच्या प्रोसेसची अपडेट चेक करु शकतात.

परताव्याची अपडेट कशी चेक करायची?

तुमच्या परताव्याचा स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम NDSL TIN वेबसाइटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर काही माहिती भरुन कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. त्या मेसेजवर क्लिक करुन तुम्ही तुमचा रिफंड स्टेट्‍स चेक करु शकतात.

Income Tax Refund
ITR Filling: ITR भरताना 'या' चुका अजिबात करू नका, अन्यथा भरावा लागू शकतो मोठा दंड

पॅन कार्डच्या मदतीने रिफंड स्टेटस कसा चेक करावा

  • तुम्ही पॅन कार्डच्या मदतीने ऑनलाइन पद्धतीने परताव्याची स्थिती चेक करु शकतात.

  • यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ई-फायलिंग पोर्टल https://eportal.incometax.gov.in/ यावर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर पॅन कार्ड, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

  • यानंतर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर My Account सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर Refund/Demand Status वर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला तुमचा रिफंड स्टेटस ऑनलाइन पद्धतीने पाहायला मिळेल.

Income Tax Refund
Income Tax Return: ITR फाइल करण्याची शेवटची तारीख! आजच अर्ज करा अन्यथा भरावा लागेल दंड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com