ITR Filling: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी, ITR फाइल करण्याची मुदत वाढणार का? प्राप्तिकर विभागाने दिलं उत्तर

ITR Filling Last Date: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहे. ३१ जुलैपूर्वी तुम्हाला आयटीआर भरावा लागणार आहे. आयटीआर भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती.
ITR Filling
ITR FillingGoogle
Published On

प्राप्तिकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै निश्चित केली आहे. मुदतीनंतर आयटीआर भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे आता आयटीआर भरण्यासाठी फक्त ४ दिवस उरले आहेत. त्यामुळे ज्या करदात्यांनी अर्ज भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर भरावा. आयकर विभागाने याबाबत अनेक करदात्यांना मेसेज किंवा ई मेल पाठवले आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, प्राप्तिकर विभागाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

ITR Filling
ITR : आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी परतावा मिळतो? पैसे न आल्यास काय करावं?

आता आयटीआर फाइल करण्यासाठी शेवटचे ४ दिवस उरले आहेत. त्यामुळे ई- फायलिंग पोर्टलवर खूप लोक एकाच वेळी आयटीआर फाइल करतात. त्यामुळे ई- फायलिंग पोर्टलवर ताण येतो. त्यामुळे अर्ज करण्याची प्रोसेस खूप हळू होते. यामुळे दिवसभरात खूप कमी अर्ज दाखल केले जातात. याआधी अनेक चार्टड अकाउंटंट्सनी ई फायलिंग पोर्टलवर येणाऱ्या समस्यांची तक्रार प्राप्तिकर विभागाकडे केली आहे.त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची तारीख वाढवून मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी या सोप्या टीप्स फॉलो करा

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यापूर्वी तुम्ही कागदपत्रे गोळा करणे खूप महत्त्वाचे आहे. इन्कम टॅक्स फाइल करण्यासाठी फॉर्म १६ सर्वात महत्त्वाचा आहे. यात तुम्हाला तुमचे उत्पन्न, करपात्र उतपन्न, टीडीएसची माहिती मिळेल. यानंतर महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे AIS. वार्षिक माहिती विधानात तुमच्या सर्व आर्थिक व्यव्हारांची माहिती दिलेली असते. जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल. त्याचे किती शेअर्स खरेदी केले किंवा विकले गेले याची माहिती तुम्हाला तेथे उपलब्ध असेल. यामुळे पगाराव्यतिरिक्त उत्पन्नाची माहिती मिळणे सोपे होते. तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटवरवरुन फॉर्म 26AS डाउनलोड करु शकतात. यामध्ये तुम्हाला टीडीएसची सर्व माहिती मिळेल.

ITR Filling
ITR Filling Bank List: ITR फाइल करताना या बँकांमधून करता येणार व्यवहार; प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेली यादी बघा!

योग्य आयटीआर फॉर्म निवडणे

तुम्ही योग्य आयटीआर फॉर्म निवडणे खूप महत्त्वाचे आहे. करदात्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतानुसार वेगवेगळे आयटीआर फॉर्म असतात. आयकर रिटर्न फाइल करण्यासाठी ७ वेगवेगळे फॉर्म असतात. त्यामध्ये करदात्यांनी त्यांच्या उत्पन्नानुसार फॉर्म निवडायचा असतो. त्यामुळे चार्टड अकाउंटंटच्या मदतीने फॉर्म भरु शकतात.

फॉर्म पुन्हा एकदा चेक करा

आयटीआर अर्ज फाइल केल्यानंतर तो पुन्हा एकदा तपासून घ्या. कागदपत्रेांची पडताळणी नीट करा. त्यानंतरच फॉर्म सबमिट करा.

३१ जुलैनंतर फॉर्म न भरल्यास काय होणार?

जर करदात्यांनी आयटीआर ३१ जुलैपर्यंत भरला नाही तर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज फाइल करु शकतात. याचा बिलेटेड रिटर्न म्हणतात. यासाठी करदात्यांनी दंड भरावा लागणार आहे.

ITR Filling
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! दोन वर्षात महिला होणार लखपती; कसं?जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com