ITR Filling Bank List: ITR फाइल करताना या बँकांमधून करता येणार व्यवहार; प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेली यादी बघा!

Income Tax Department Give Authorize Bank List for ITR Payment: आयटीआर दाखल करत करताना पेमेंट बँकेद्वारे केले जाते. आयकर विभागाने आयटीआर कर पेमेंटसाठी अधिकृत बँकाची यादी जाहीर केली आहे.
ITR Filling: ITR फाइल करताना या बँकांमधून करता येणार व्यवहार; प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेली यादी बघा!
ITR FillingSaam TV
Published On

आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. ३१ जुलैआधी आयटीआर तुम्हाला आयटीआर भरावा लागणार आहे. नवीन ई-पे कर सेवा फायलिंग साइटमुळे कर भरणे खूप सोपे झाले आहे. यामुळे CRN, पेमेंट, पेमेंट हिस्ट्री ट्रॅकिंग यासांरख्या सेवा करदात्यांना मिळतात. करदाते त्यांच्या पेमेंटची सर्व माहिती एका क्लिकवर मिळवू शकतात.

ITR Filling: ITR फाइल करताना या बँकांमधून करता येणार व्यवहार; प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेली यादी बघा!
ITR Filling: क्रेडिट कार्डने करु शकणार इन्कम टॅक्सचे पेमेंट; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

यामुळे करदात्यांना पेमेंटसाठी नेट बँकिंग, डेबिट कार्ड, बँक काउंटवर पेमेंट यांसारखे अनेक पर्याय दिले जातात. आयकर विभागाने ई- पे कर सेवेसाठी काही बँकाना परवानगी दिली आहे. याच बँकाची यादी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या बँकेद्वारे तुम्ही पेमेंट करु शकतात.

बँकाची यादी,अॅक्सिस बँक, बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,सिटी यूनियन बँक, डीसीबी बँक,फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडसइंड बँक,जम्मू काश्मीर बँक, कोटक महिंद्रा बँक, कर्नाटक बँक, पंजाब आणि सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, आरबीएल बँक, युको बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया,धनलक्ष्मी बँक या बँकाचा या यादीत समावेश आहे.

ITR Filling: ITR फाइल करताना या बँकांमधून करता येणार व्यवहार; प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेली यादी बघा!
Petrol Diesel Rate: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरातील भाव काय?

ई-फायलिंग पोर्टलवर कर भरण्यासाठी तुम्हाला चलन (CRN)तयार करणे अनिवार्य आहे. प्रत्येक चलनासाठी एक सीआरएन नंबर असतो. सीआरएन नंबर तयार झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पेमेंट करु शकतात. तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड, बँक अकाउंट पेमेंट, RTGS/NEFT,पेमेंट गेटवे,UPI पेमेंटद्वारे तुम्ही पेमेंट करु शकतात.

ITR Filling: ITR फाइल करताना या बँकांमधून करता येणार व्यवहार; प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेली यादी बघा!
Gold Silver Rate : सोन्यासह चांदीच्या किंमतीत मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील नवे दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com