नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई केल्यानंतर कोटक महिंद्रा बँकेचे बुरे दिन सुरू झाले आहेत. मागील वर्षी दोन दिवसांत या बँकेच्या शेअरमध्ये १३ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांना मोठं नुकसान झालं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये गुरुवारी १० टक्यांनी घसरण झाली. तर शुक्रवारी या बँकेच्या शेअरमध्ये २ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. या बँकेच्या शेअरची किंमत १,६१४.७० रुपयांवर आली आहे.
गुरुवारी आणि शुक्रवारी कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने बँकेच्या मार्केट कॅपमध्येही घसरण पाहायला मिळाली. यामुळे बँकेचं मार्केट कॅप ३.१९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तसेच या बँकेने देशातील चौथ्या मोठ्या बँकेचा दर्जा गमावला आहे. तर आता देशात Axix बँक ही देशात चौथी ठरली आहे.
मार्च महिन्यात अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे मार्केट कॅपमध्ये तेजी आली आहे. तर यामुळे या बँकेचे मार्केट कॅप बाजारात ३.४८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. महिंद्रा बँकेपेक्षा अॅक्सिस बँकेचे मार्केट कॅप अधिक आहे. अॅक्सिस बँकेला जानेवारी-मार्चमध्ये ७,१३० कोटी रुपयांचा लाभ झाला. तर मागच्या वर्षी ५,७२८.४ कोटी रुपयांचं नुकसन झालं होतं.
आरबीआयच्या कारवाईआधी बुधवारी कोटक महिंद्रा बँकेचे मार्केट कॅप हे ३.६६ लाख कोटी रुपये होते. जे दुसऱ्या दिवशी घसरून ३.१९ लाख कोटी रुपये इतके झाले. यामुळे कोटक महिंद्राला मार्केट कॅपमध्ये एकूण ४७००० रुपयांचं नुकसान झाल्याचे समोर आलं आहे. तर गुरुवारी कोटक महिंद्रा बँकेच्या मार्केट कॅपमध्ये ३६ कोटी रुपयांची घट झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.