Income Tax Filing : आयटीआर भरण्यासाठी काही तासांचाच अवधी शिल्लक, तारीख वाढवण्याची करदात्यांची मागणी

ITR Filling Deadine Extend Till 31 August: आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. ३१ ऑगस्टनंतर आयटीआर फाइल केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. करदात्यांनी आयटीआर फाइल करण्यासाछी मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.
Income Tax Return
Income Tax ReturnSaam Tv
Published On

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीक ३१ जुलै २०२४ आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी मुदत वाढवण्याची मागणी केली जात आहे. ई-फायलिंगच्या वेबसाइटवर येणाऱ्या समस्यांमुळे करदात्यांनी ही मागणी केली आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स (All India Federation Tax) ने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने मुल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी आयकर रिटर्न भरण्याची मागणी केली आहे. (ITR Filling Deadline)

Income Tax Return
ITR Filling: ITR भरताना 'या' चुका अजिबात करू नका, अन्यथा भरावा लागू शकतो मोठा दंड

आयकर रिटर्न भरण्याची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे. आज ३० जुलैपर्यंतदेखील अनेक करदात्यांनी आयटीआर (ITR) अर्ज दाखल केलेले नाही. तांत्रिक अडचणी, वेबसाइटवर येणाऱ्या समस्यांमुळे ही मागणी केली जात आहे. एआयएफटीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण जैन यांनी निवेदनात म्हटले आहे की, अनेक राज्यांमध्ये पुरामुळे आयटीआर रिटर्न भरण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे करदात्यांनी आयटीआर अर्ज दाखल करता येत नाहीये. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन झाले आहे. त्यामुळे करदात्यांना आयटीआर फाइल करण्यासाठी समस्या येत आहेत.

Income Tax Return
ITR Filling: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी, ITR फाइल करण्याची मुदत वाढणार का? प्राप्तिकर विभागाने दिलं उत्तर

आयकर पोर्टलवर इन्कम टॅक्स फॉर्म डाउनलोड करताना आणि पडताळणी करताना अडचणी येत आहे.त्यामुळे एकाच व्यक्तीचा फॉर्म भरण्यासाठी खूप वेळ खर्च होत आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात येत आहे. मात्र, प्राप्तिकर विभागाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Income Tax Return
Ayushman Bharat Yojana : आजारी पडल्यास ५ लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार; काय आहे आयुष्मान भारत योजना? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com