Earthquake in Himachal Pradesh: जम्मू काश्मीरनंतर हिमाचल प्रदेश भूंकपाने हादरला; चंबामध्ये 5.3 रिश्टर स्केलचे धक्के

Earthquake in Himachal Pradesh's Chamba: हिमाचल प्रदेशातील चंबा येथे भूकंपाचे तिव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 5.3 इतकी मोजली गेली आहे. अद्याप कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
Earthquake in Himachal Pradesh
Earthquake in Himachal PradeshSaam Digital

Earthquake in Chamba

हिमाचल प्रदेशातील चंबा येथे भूकंपाचे तिव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 5.3 इतकी मोजली गेली आहे. अद्याप कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. हिमाचलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याच्या काही मिनिटांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाचे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 किमी खाली आहे. अनेक भागात भूकंपाचे रात्री ९.३४ च्या सुमारास तिव्र धक्के जाणवले.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी विभागाने यांसंदर्भात माहिती दिली आहे.

Earthquake in Himachal Pradesh
Shiv Jayanti 2024: हिमवर्षावातही छत्रपती शिवरायांचा जयघोष, भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंती साजरी

मनालीमध्ये राहणाऱ्या लोकांनी सांगितलं की, त्यांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के काही सेकंदांसाठीच आले पण ते खूप तीव्र होते, त्यानंतर लोक घराबाहेर पडले. तैवानमध्ये ३ मार्च रोजी ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता.गेल्या 25 वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. तैवानमध्ये आलेल्या भूकंपानंतर दुसऱ्याचं दिवशी भारतात हिमालचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये भूंकप आला आहे. हिमालय आणि आजूबाजूच्या प्रदेशात गेल्या ६ महिन्यांपासून सातत्यांने भूकंप येतायेत. शास्त्रज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Earthquake in Himachal Pradesh
Heatwave Warning : उष्माघातापासून कसा कराल स्वत:चा बचाव? काय आहेत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना? जाणून घ्या

तैवान भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलियन काउंटीच्या किनारपट्टी भागात होता. भूकंपामुळे तैपेईमध्ये 150 किमी अंतरापर्यंत नुकसान झाले आहे. या भूकंपात ९ जणांचा मृत्यू झाला असून ९३४ लोक जखमी झाले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलियनच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 35 किलोमीटर भूगर्भात असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपात तैपेईच्या दक्षिणेला असलेल्या मुख्य विमानतळाच्या काही भागाचेही नुकसान झाले आहे. या भूकंपामुळे अनेक इमारतीही जमीनदोस्त झाल्या आहेत.

Earthquake in Himachal Pradesh
Loksabha Election: प्रकाश राज भाजपमध्ये प्रवेश करणार? पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com