राजकारणावर परखड मत मांडणारे दक्षिण सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमधील अभिनेते प्रकाश राज राजकारणात पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. फक्त भाजपच नाहीतर राजकारणातील लहान मोठ्या घडामोडीवर प्रकाश राज टीका करण्यात अग्रेसर असतात. हेच प्रकाश राज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. या चर्चांवर स्वत: प्रकाश राज यांनी खुलासा करत सर्व वावड्यांना शांत केलं आहे.
तसेच संधी साधत भाजप परत एकदा टीका केलीय. सर्व चर्चांवर प्रकाश राज यांनी एक ओळीची सोशल मीडियावर पोस्ट करत खळबळ उडवून दिलीय. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर प्रकाश राज यांनी उपहासात्मक पोस्ट केलीय. त्याची ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'प्रकाश राज दुपारी ३ वाजता भाजपमध्ये सामील होतील.' या पोस्टला उत्तर देताना प्रकाश राज यांनी मौन सोडत उत्तर दिलंय. 'मला वाटते की त्यांनी खूप प्रयत्न केले, पण नंतर त्यांना समजले की ते मला विकत घेण्याइतका श्रीमंत नाहीत. तुम्हाला काय वाटतं?' अशा आशयाची पोस्ट प्रकाश राज यांनी केलीय.
यावर्षी जानेवारीमध्ये प्रकाश राज यांनी केरळ लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात भाष्य केले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मी त्यांचा उमेदवार व्हावे यासाठी तीन राजकीय पक्ष माझ्यामागे आहेत. पण कोणत्या विचारधारेमुळे नाही तर मी केंद्र सरकारचा टीकाकार असल्यामुळे मला पक्ष प्रवेश करण्यास आग्रह करत आहेत, असं प्रकाश राज म्हणाले होते.
प्रकाश राज यांनी याआधीही भाजपवर टीका केलीय. याआधीही भाजप प्रवेशाच्या चर्चांवरती त्यांनी जोरदार टीका केली होती. 'मला कोणताही पुरस्कार नको आहे. अच्छे दिन येतील हे मला सांगू नका, मी नावाजलेला अभिनेता आहे, तुम्ही अभिनय करत आहात हे मी सहज ओळखू शकतो,असं प्रकाश राज म्हणाले होते. 'धर्म, संस्कृती आणि नैतिकतेच्या नावाखाली भीती निर्माण करणे हा दहशतवाद नाही तर काय?' असेही विधान त्यांनी एकदा केलं होतं. त्यांच्या अशा विधानांमुळे ते चर्चेत येत असतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.