Ayushman Bharat Yojana : आजारी पडल्यास ५ लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार; काय आहे आयुष्मान भारत योजना? जाणून घ्या

Ayushman Bharat Card Yojana: केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात आयुष्मान भारत योजना एक आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळतात.
Ayushman Bharat Yojana
Ayushman Bharat YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकार नागरिकांसाठी नेहमी नवनवीन योजना राबवत असतात. सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना. या योजनेत सरकार नागरिकांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार घेण्यासाठी मदत करते.

आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवण्यात आली आहे. या योजनेत गरीब लोकांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात. यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवून घ्यावे लागेल. आयुष्मान कार्ड असल्यावरच तुम्ही हॉस्पिलमध्ये जाऊन मोफत उपचार घेऊ शकणार आहात.

Ayushman Bharat Yojana
Loan Scheme for Disabled Persons: दिव्यांग नागरिकांसाठीची कर्ज मर्यादा ५० हजारांवरून अडीच लाख करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

पात्रता

या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. २०११ च्या जणगणनेनुसार, ज्या लोकांचा समावेश गरीब गटात झाला आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. या व्यक्तींना ५ लाखांपर्यंतचा क्लेम मिळतो. रुग्णालयात झालेला खर्च या योजनेतून मिळणार आहे.

Ayushman Bharat Yojana
Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला pmjay.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे गेल्यावर तुम्हाला Am I Eligible पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाका. तिथे तुम्हाला ओटीपीभरावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.यानंतर मोबाइल नंबर आणि रेशन कार्ड नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्ही आयुष्मान कार्ज बनवण्यासाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला समजेल. आयुष्मान कार्ज बनवण्यासाठी तुम्हाला आधारकार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र ही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत.

Ayushman Bharat Yojana
ITR Filling: ITR भरताना 'या' चुका अजिबात करू नका, अन्यथा भरावा लागू शकतो मोठा दंड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com