Tax Free State : भारतात एक राज्य असंही, जिथे कोट्यवधी रुपये कमावले तरी भरावा लागत नाही आयकर

Tax Free State In India: भारतात एका राज्यात तुम्ही कोट्यवधी रुपये कमावले तरीही तुम्हाला कर भरावा लागत नाही. या राज्यातील रहिवाशांसाठीच हा नियम लागू होतो.
Tax Free State In India
Tax Free State In IndiaSaam Tv
Published On

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै निश्चित करण्यात आली आहे. ३१ जुलैनंतर आयटीआर फाइल करता येणार नाही. जर तुम्ही मुदतीनंतर आयटीआर फाइल केला तर तुम्हाला दंड भरावा लागेल.कर वाचवण्यासाठी अनेक लोक खोटे क्लेम करतात. परंतु यामुळे त्यांच्यावर करावाई होऊ शकते. मात्र, भारतात असे एक राज्य आहे की, जिथे कर भरावा लागत नाही.

तुमची कमाई कोट्यवधी रुपये असली तरीही तुम्हाला कर भरावा लागत नाही. सिक्किम राज्यात हा नियम आहे. सिक्किममध्ये कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही.

Tax Free State In India
Ayushman Bharat Yojana : आजारी पडल्यास ५ लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार; काय आहे आयुष्मान भारत योजना? जाणून घ्या

सिक्किम राज्यातील मूळ रहिवाशांना स्वातंत्र्यापासून आयकर सवलत मिळते. मात्र, आता ही सवलत बंद करण्याची मागणी देशभरातून केली जात आहे. सिक्किमचे मूळ रहिवासी या सूटचा गैरवापर करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

सिक्किम राज्य १९७५ रोजी भारतात विलीन झाले. तेव्हा सिक्किम राज्याने जुना कायदा स्विकारायचा, अशी अट ठेवली होती. सिक्किम राज्याचा विशेष दर्जा राखण्यासाठी आयकर कलम १९१६ स्विकारण्यास नकार दिला होता. भारताने ही अट मान्य केली होती. यामुळे आयकर कायदा 1961 च्या कलम 10 (26AAA) अंतर्गत करमुक्त राज्य आहे. भारतीय संविधान कलम 371F अंतर्गत सिक्किमला विशेष दर्जा मिळाला आहे.

Tax Free State In India
ITR Filling: ITR भरताना 'या' चुका अजिबात करू नका, अन्यथा भरावा लागू शकतो मोठा दंड

कलम 10 (26AAA) काय आहे?

कलम 10 (26AAA) अंतर्गत सिक्किमच्या रहिवाशांचा आयकरमध्ये समावेश केला जाणार नाही. सिक्किम भारतात विलीन होण्यापूर्वी सिक्किमचे रहिवासी असलेल्या लोकांना कलम 10 (26AAA) अंतर्गत करातून सूट देण्यात आली आहे.

Tax Free State In India
ITR Filing Deadline: कोणते करदाते अंतिम मुदतीनंतरही इन्कम टॅक्स रिटर्न्स भरू शकतील?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com