आयटीआर फाइल करण्याची आज म्हणजेच ३१ जुलै ही शेवटची तारीख आहे. ३१ जुलैनंतर जर तुम्ही आयटीआर फाइल केला तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. आतापर्यंत ५ कोटी करदात्यांनी आयटीआर दाखल केला आहे.जर तुम्ही अजूनपर्यंत आयटीआर फाइल केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
आयटीआर फाइल करण्यासाठी आजची शेवटची तारीख असली तरीही ही मुदत वाढवून देण्याची मागणी करदात्यांकडून केली जात आहे. ई-फायलिंग पोर्टलवर येणाऱ्या समस्यांमुळे मुदत वाढवून द्यावी.३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवावी, असं करदात्यांचे म्हणणे आहे. मात्र, प्राप्तिकर विभागाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
जर मुदतीपूर्वी आयटीआर भरला नाही तर काय होणार?
जर तुम्ही मुदतीआधी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला जुन्या कर प्रणालीतील फायदे मिळणार आहे. तुम्हाला आपोआप नव्या कर प्रणालीत शिफ्ट केले जाऊ शकते. त्यामुळे उपलब्ध सूट आणि अतिरिक्त व्याज जास्त आकारले जाईल.
जर तुम्ही आयटीआर उशिरा भरला तर तुम्हाला कलम 234F अंतर्गत ५,००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. जर तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल तर १००० रुपये शुल्क भरावे लागणार. त्यानंतर कराच्या रक्कमेवर मासिक १ टक्के व्याज भरावे लागणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.