Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; फक्त २२ व्या वर्षी IAS; सुलोचना मीना यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of Sulochana Meena : सुलोचना मीना यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मेहनतीला पर्याय नाही. तुम्ही कोणत्याही शॉर्टकटने यश संपादन करु शकत नाही. जरी शॉर्टकटने यश मिळवलं तरीही जास्त काळ ते टिकत नाही. त्यामुळे आयुष्यात नेहमी मेहनत करावी.अशीच मेहनत सुलोचना मीना यांनी केली आणि खूप कमी वयात मोठं यश मिळवलं.

सुलोचना मीना यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. (Success Story Of IAS Sulochana Meena)

सुलोचना मीना या मूळच्या राजस्थानमधील सवाई मधुपूर येथी आदलवाडा गावच्या रहिवासी. त्या आपल्या जिल्ह्यातील पहिल्या महिला आयएएस ऑफिसर आहेत. त्यांनी २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली होती. यात त्यांनी ४१५ रँक मिळवली.

सुलोचना मीना या सर्वात तरुण आयएएस ऑफिसरपैकी एक आहेत. सुलोचना यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या दिल्लीला गेल्या. तिथे त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.त्यानंतरच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्या रोज वर्तमानपत्र वाचायच्या. त्यांना सर्व गोष्टींची माहिती होती. (Success Story)

सुलोचना यांनी सेल्फ स्टडी करुन यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी युट्यूब, टेलिग्राम या अॅपवरुन अनेक माहिती मिळवली. याचसोबत टेस्ट सीरीजवर लक्ष दिले. याचसोबत वेगवेगळी पुस्तके वाचली. त्यानंतर मॉक टेस्ट दिल्या. त्या रोज ८ ते ९ तास अभ्यास करायच्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

SCROLL FOR NEXT