
आयुष्यात आपली अनेक स्वप्ने असतात. परंतु काही कारणांनी, परिस्थितीमुळे आपल्याला वेगळा मार्ग निवडावा लागतो. अनेकदा आपल्याला स्वप्न सोडून नोकरी करावी लागते. परंतु अनेकजण काहीतरी वेगळा विचार करतात आणि स्वप्न पूर्ण करतात.असंच काहीतरी डॉ. कामिनी सिंग यांनी केलं. त्यांनी चांगल्या पगाराची सरकारी नोकरी सोडली आणि व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्या आज कोट्यवधींच्या मालकीण आहेत.
कामिनी या शेवग्याची लागवड करतात. बाजारात शेवग्याच्या शेंगा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याचा फायदा लक्षात घेऊन त्यांनी या पिकाची लागवड करण्याचे ठरवले. कामिनी यांनी शेवग्यापासून साबण, तेल, मच्छर प्रतिबंधक स्प्रे, चहा, शेवग्याची पावडर तयार केला. त्यांची ही उत्पादने सेंद्रिय आहेत.
कामिनी यांनी लखनऊ येथे शास्त्रज्ञ म्हणू काम केले होते. नोकरी करतानाच त्यांचा शेतीकडे कल वाढला. ७ वर्षानंतर त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शेवग्याच्या शेतीवर संशोधन केले. याच काळात त्यांना एका कंपनीत संचालकपदी काम करण्याची ऑफर मिळाली. त्यांनी ती स्विकारली. या कंपनीत काम करताना त्यांचा शेतकऱ्यांशी संपर्क वाढला.
कामिनी यांनी २०१७ मध्ये शेवग्याच्या लागवडीसाठी पायलट प्रोजेक्ट सुरु केला. शेवग्याची शेती करण्यासाठी कोणत्याही रसायनाची गरज नाही. प्रत्येक हंगामात ही शेती केली जाते. असंही त्यांच्या लक्षात आहे.
शेवग्याच्या झाडाची पाने, मुळे हे जीवनसत्त्व आणि खनिजे यांनी समृद्ध आहेत. त्यात अँटी ऑक्सिडंट्स, अँटी कॅन्सर आणि अँटी इंफ्लेमेंटरी गोष्टी आहेत. यावर त्यांनी संशोधन केले.
२०१९ मध्ये कामिनीने स्वतः ची संस्था सुरु केली. त्यांनी अनेक शेतकऱ्यांसह मोरिंगा पावडर, साबण, तेल, कॅप्सूल इत्यादी वस्तू बनवायला सुरुवात केली.सुरुवातीला त्यांनी लहान पॅकेटमध्ये शेवग्याची पावडर विकायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना २५ लाखांचे अनुदान मिळाले. त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. त्यांनी तेल आणि कॅप्सूल भरण्यासाठी मशीन विकत घेतले.
आज कामिनी यांचा हा बिझनेस खूप मोठा झाला आहे. ते आज ५०-१०० शेतकऱ्यांसोबत काम करतात.त्यांची आज वार्षिक कमाई १.७५ कोटी रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.