Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडील सुपरस्टार, नाईट शिफ्ट अन् दिवसा अभ्यास करत मिळवलं यश; IAS श्रुतंजय नारायणन यांचा प्रवास

Success Story of IAS srutanjay Narayan: वडील साउथ इंडस्ट्रीत सुपरस्टार असतानाही श्रुतंजय नारायणन यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस पदाला गवसणी घातली आहे.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या आईवडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवतात. आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा आईवडील जे काम करतात ते मुलांना करावं वाटतं. सिनेसृष्टीमध्ये ही गोष्ट नेहमी होत असते. सुपरस्टारचा मुलगा हा नेहमी अभिनेता होतो, असं अनेकांना वाटतं. अनेक सुपरस्टारची मुलेदेखील अभिनेते झाले आहेत. परंतु काहींनी वेगळी वाट निवडली आहे. असेच एक व्यक्तीमत्त्व म्हणजे आयएएस श्रुतंजय नारायणन.

वडील सुपरस्टार तर लेक IAS (South Superstar Son Crack UPSC)

IAS श्रुतंजय नारायणन यांचे वडील साउथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार आहेत. ते अभिनेते चिन्नी जयंत उर्फ कृष्णमूर्ती नारायण यांचा मुलगा आहे. वडील सिनेसृष्टी गाजवत आहेत तर मुलाने यूपीएससी परीक्षा क्रॅक करत आयएएस पदाला गवसणी घातली आहे. त्यांचा हा प्रवास खूप वेगळा आणि प्रेरणादायी आहे.

IAS श्रुतंजय नारायणन यांचे शिक्षण (IAS srutanjay Narayan Success Story)

IAS श्रुतंजय नारायणन हे लहानपणापासूनच हुशार होते. त्यांनी गिंदी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनदेखील केले. त्यांनी एका स्टार्टअपमध्ये काम केले. त्यांना आपली वेगळी ओळख निर्माण करायची होती. त्यामुळे त्यांनी आयएएस ऑफिसर होण्याचे ठरवले. त्यांनी नाईट शिफ्टमध्ये काम केले. दिवसाला रोज ४-५ तास अभ्यास केला. त्यांनी या काळात वडिलांकडून एकही रुपया मदत घेतली नव्हती.

IAS श्रुतंजय नारायणन यांनी खूप अभ्यास केला. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.श्रुतंजय नारायणन यांनी २०१५ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी संपूर्ण भारतातून ७५ रँक प्राप्त केली. श्रुतंजय नारायणन यांचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी वडील इंडस्ट्रीत सुपरस्टार असतानाही काहीतरी वेगळं करण्याची वाट निवडली आणि यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

SCROLL FOR NEXT