IAS Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: पोलिओ झाला, वडिलांचं छत्र हरपलं, खडतर परिस्थितीत IAS झाला, सोलापूरच्या सुपुत्राची यशोगाथा वाचा

IAS Ramesh Gholap Success Story: लहानपणी पायाला पोलिओ झाला, वडिलांचे छत्र हरपलं. खूप खडतर परिस्थितीतून यूपीएससी परीक्षा दिली आणि क्रॅक केली. महाराष्ट्राच्या आयएएस रमेश घोलप यांची यशोगाथा वाचा.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षा पास करणं हे खूप मोठं आव्हान आहे. यूपीएससी परीक्षा देताना खूप मोठा संघर्ष करावा लागतो. अनेकदा परिस्थितीमुळे तर अनेकदा सतत येणाऱ्या अपयशामुळे अनेकजण खचून जातात. परंतु खडतर परिस्थितीतदेखील आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो व्यक्ती प्रयत्न करतो तो नेहमी यशस्वी होतो. असंच यश आयएएस रमेश घोलप यांना मिळालं.

रमेश हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूरातील रहिवासी. रमेश यांचे वडील कारचे पंक्चर काढायचे. लहानपण रमेश यांच्या पायाला पोलिओ झाला होता. त्यामुळे त्यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागले. पोलिओ झाल्यामुळे पाय दुखायचा.रमेशच्या लडिलांना दारु पिण्याची सवय होती. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबावर खूप वाईट वेळ आली. (IAS Success Story)

रमेश यांची आई रस्त्यावर बांगड्या विकायची. रमेश नेहमी आपल्या आईवडिलांना कामात मदत करायचे.रमेश यांनी शालेय शिक्षण आपल्या गावातच पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी काकांकडे बार्शी या गावाला गेले. त्यांना १२ वीच्या परिक्षेत ८८.५० टक्के गुण मिळाले.

रमेश यांनी डिप्लोमा केला. त्यानंतर ते गावातील एका शाळेत शिकवायलादेखील जायचे. त्यांनी बीए डिग्री प्राप्त केली होती. त्यांच्या आईला सामूहिक ऋण योजनेअंतर्गत गाय खरेदी करण्यासाठी १८ हजार रुपये मिळाले होते. या पैशांमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. (IAS Ramesh Gholap Success Story)

वडिलांच्या दारुच्या सवयीमुळे त्यांच्या कुटुंबाला खूप वाईट दिवस काढावे लागले. आईने बांगड्या विकून मुलांना मोठं केलं. त्यावेळी रमेश यांच्या गावारुन काकांच्या गावी जाण्यासाठी बसचे तिकीट ५ रुपये होते. परंतु ते पोलिओग्रस्त असल्याने त्यांना फक्त २ रुपये द्यावे लागायचे.

रमेश घोलप हे पहिल्या दोन प्रयत्नात अयशस्वी झाले होते. २०११ साली त्यांनी यूपीएससी परिक्षेत २८७ रँक प्राप्त केली. रमेश सध्या आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

SCROLL FOR NEXT