Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: लहानपणी गुरं चरायला घेऊन जायच्या, १२वी नंतर लग्नासाठी दबाव, तरीही UPSC देण्याचा निर्धार; IAS सी वनमथी यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story OF IAS C Vanmathi: आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करुन जो व्यक्ती प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. असंच यश आयएएस सी वनमथी यांना मिळालं आहे.

Siddhi Hande

आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही तो व्यक्ती प्रयत्न करतो तो नक्कीच यशस्वी होतो. असंच यश आयएएस सी वनमथी यांना मिळालं आहे. सी वनमथी यांनी खूप खडतर परिस्थितीतून यश मिळवलं आहे. सी वनमथी यांची आर्थिक परिस्थिती खूप कमजोर होती. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आव़ड होती. परंतु काही कारणांमुळे त्यांना नेहमी आपल्या स्वप्नांमध्ये तडजोड करावी लागली होती. (Success Story)

सी वनमथी यांचे बालपण खूपच खडतर परिस्थितीत गेले. त्यांना खूप कमी वयात काम करावे लागले होते. त्यांच्या घरच्यांनी लग्नासाठी त्यांच्यावर दबावदेखील टाकला होता. परंतु त्यांनी आपल्या पायावर उभे राहायचे ठरवले. त्यांनी आयएएस बनण्याचे ठरवले.

सी वनमथी या मुळच्या तमिलनाडूच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडिल कॅब ड्रायव्हर आहेत. त्यांच्या पगारातून संपूर्ण घर चालवणे हे खूप कठीण होते. कुटुंबात कितीही आर्थिक अडचणी असल्या तरीही त्यांच्या आईवडिलांनी मुलीच्या शिक्षणात कणतीही अडचण येऊन दिली नाही.(C Vanmathi Success Story)

सी वनमथी यांनी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी अभ्यासासोबत काम सुरु केले. जेणेकरुन घराला हातभार लागेल. सी वनमथी या अभ्यास झाल्यानंतर गुरे राखायला जायच्या. त्यांना खायला घालायच्या.

सी वनमथी यांच्या घरातील मुलींना १२वी नंतर शिक्षणासाठी बंदी होती. परंतु तरीही त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. सी वनमथी यांच्यावर १२वीची परीक्षा झाल्यानंतप लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. परंतु त्यांना शिकायचे होते. त्यांच्या आईवडीलांनीदेखील त्यांच्या या निर्णयाला सपोर्ट केला. (Success Story Of Cattle Herder)

सी वनमथी यांनी कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यांनंतर त्यांनी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. त्यांना आयएएस होण्याची प्रेरणा ही टीव्ही सिरियलमधून मिळाली. एका कार्यक्रमात आयएएस अधिकारीच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री होती. त्यांच्याकडे पाहून सी वनमथी यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी यूपीएससी (UPSC Exam)परीक्षा क्रॅक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijaykumar Deshmukh News : भाजप कार्यकर्ता म्हणून काम करायचंय, विजायकुमार देशमुखांची मोठी प्रतिक्रिया | Video

Maharashtra News Live Updates: राज ठाकरे पुढील २ ते ३ दिवसांत पुणे दौऱ्यावर जाण्याची शक्यता

Travel In Winter: नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी पाहायची आहे का? भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या

Ind vs Aus: पर्थचा कौल अखेर भारताच्याच बाजूने; टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव

Lucky Zodiac Sign: आज 'या' 5 राशींना मिळेल 'गुडन्यूज'; करिअरसह नात्याची फुलेल गुफंण

SCROLL FOR NEXT