Dhanshri Shintre
साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या घरी लवकरच सनई वाजणार आहे.
अभिनेत्याचा मुलगा आणि अभिनेता नागा चैतन्य लवकरच त्याची प्रेमिका शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
नागा चैतन्यचा हा दुसरा विवाह आहे. त्यांचे पहिले लग्न सामंथा रुथ प्रभू या अभिनेत्रीसह झाले होते.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाचे ऑगस्टमध्येच साखरपुडा झाला होता, त्यानंतर दोघेही लग्न करणार आहेत.
नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नात कोणतेही भव्य आयोजन होणार नाही. कुटुंबाने कोणतेही फॅन्सी ठिकाण निवडलेले नाही.
फक्त 300-400 लोक सादीला उपस्थित राहतील, जे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य असतील.
नागार्जुनने सांगितले की त्यांचा मुलगा नागा चैतन्यला त्याचे लग्न अजिबात मोठे व्हावे असे वाटत नाही. दोघांनाही जवळचे कुटुंब आणि मित्रांमध्येच लग्न करायचे आहे.
त्यांच्या लग्नाची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली आहे. त्यांना त्याचे लग्न त्याच्या पद्धतीने करायचे आहे.
शोभिता आणि नागा चैतन्य ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत.
NEXT: Dream Astrology: स्वप्नात या गोष्टी दिसल्यास होईल तुमचं लग्न