IAS Success Story Saam tv
बिझनेस

IAS Success Story: CA झाली, नंतर UPSC परीक्षेत मिळवली दुसरी रँक; वडिलांचे स्वप्न केले पूर्ण; IAS हर्षिता गोयल यांचा प्रवास

IAS Harshita Goyal Success Story: हर्षिता गोयल यांनी यूपीएससी परीक्षेत दुसरी रँक मिळवली आहे. त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करत आयएएस पदाला गवसणी घातली आहे.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. कितीही अपयश आले तरीही हार मानायची नसते. असंच काहीसं हर्षिता गोयल यांनी केलं. त्यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी यूपीएससी २०२४ मध्ये दुसरी रँक प्राप्त केली.

हर्षिता गोयल यांनी मेहनत आणि देशसेवा करण्याच्या इच्छेने यूपीएससी (UPSC) परीक्षा पास केली. त्यांच्या या यशाचं श्रेय त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबालाही जातं. हर्षिता गोयल या चार्टर्ड अकाउंटंट आहेत. याचसोबत त्यांनी MS युनिव्हर्सिटी ऑफ बडोदामधून ग्रॅज्युएट झाले.

कुटुंबातील पहिली IAS अधिकारी

हर्षिता यांनी लहानपणापासूनच समाजसेवा करण्याचे स्वप्न पाहिले. महिलांना सशक्त बनवणे हा त्यांचा संकल्प आहे. हर्षिता या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या सदस्य आहेत ज्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांच्या आईवडिलांनी खूप मेहनतीने आपल्या मुलीला शिकवले आणि तिला यूपीएससी परीक्षा देण्यासाठी प्रेरित केले.

बी.कॉमचे शिक्षण

हर्षिता गोयल या मूळच्या हरियाणाच्या रहिवासी. त्या गुजरातमध्ये लहानाच्या मोठी झाल्या. त्यांनी बडोदा महाविद्यालयात बी.कॉम डिग्री प्राप्त केली होती. त्यानंतर त्या चार्टर्ड अकाउंटंट झाल्या. यानंतर यूपीएससी परीक्षा दिली. हर्षिता यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला. हर्षिता यांचा जेव्हा यूपीएससी परीक्षेत दुसरी रँक मिळाली तेव्हा त्यांच्या कुटुंबाला खूप आनंद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पालघरमध्ये भूकंपाच्या पार्श्वभूमीवर NDRFचे जनजागृती प्रशिक्षण

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

SCROLL FOR NEXT