Success Story: संघर्षाच्या काळात गर्लफ्रेंडने दिली साथ; कोणत्याही कोचिंगशिवाय क्रॅक केली JPSC; अमन कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of Aman Kumar Crack JPSC: अमन कुमार यांनी झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली आहे. त्यांच्या गर्लफ्रेंडने आणि कुटुंबाने त्यांना कठीण काळात खूप साथ दिली. त्यामुळेच त्यांनी हे यश मिळवलं आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary
  • अमन कुमार यांनी कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय क्रॅक केली JPSC

  • गर्लफ्रेंडने दिली संघर्षाच्या काळात साथ

  • आईवडिलांचे नाव मोठे करण्यासाठी मोठ्या जिद्दीने झाला अधिकारी

Summary

आयुष्यात कोणतीही परीक्षा असो ती आपण प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर क्रॅक करुच शकतो. जर तुमच्याकडे परिश्रम करण्याची ताकद असेल तर तुम्ही यश हे मिळवूच शकतात. कोणतीही स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती खूप महत्त्वाची असते. असंच काहीसं अमन कुमार यांच्यासोबत झालं. त्यांनीही स्वतः वर विश्वास ठेवला आणि स्पर्धा परीक्षा पास केली. त्यांनी झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली आहे.

Success Story
Success Story: एकदा नाही तर सलग दोनदा UPSC क्रॅक; IAS विकास मीणा यांचा प्रेरणादायी प्रवास

अमन कुमार यांचा प्रवास (Aman Kumar Crack JPSC)

अमन कुमार यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय JPSC परीक्षा पास केली आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या कुटुंबाचा आणि गर्लफ्रेंडचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या गर्लफ्रेंडने त्यांना खूप कठीण काळात साथ दिले. त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्याच विश्वासाचं फळ आज त्यांना मिळालं आहे.

दहावीत असतानाच केला होता संकल्प

अमन यांना दहावीत असल्यापासूनच सिव्हिल सेवेत जाण्याची इच्छा होती. त्यांचे मोठे भाऊदेखील अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींसाठी मोठ्या भावाने मदत केली. त्यांनी दिवसरात्र अभ्यास करुन ही परीक्षा पास केली आहे. त्यांनी आपल्या या यशाचं श्रेय आईवडिल आणि गर्लफ्रेंडला दिले आहे.

अमन यांनी सांगितले की, त्यांनी बारावीनंतर आनंद कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय अभ्यास केला. पुस्तके, इंटरनेट आणि चॅटजीपीटीच्या माध्यमातून त्यांनी अभ्यास केला.

अमन यांचे वडील अनिल प्रसाद यांचे सेकंड हँड पुस्तकांचे दुकान आहे. घरखर्च भागवण्यासाठी ते स्वतः चे दुकान चालवायचे. आज लेक अधिकारी झाल्याने त्यांचे वडील खूपच आनंदी आहेत. त्यांनी खूप मेहनतीने हे यश मिळवलं आहे.

Success Story
Success Story: युट्यूब आणि Google वरुन अभ्यास; क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; पहाडिया समाजातील लेक होणार प्रशासकीय अधिकारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com