
यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देताना अनेकदा अपयस येते. परंतु कितीही अपयश आले तरीही हार मानायची नसते. आपली मेहनत सुरु ठेवायची असते. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे विकास मीना. कितीही अपयश आले तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. २०१७ च्या बॅचचे ते टॉपर आहेत.
विकास मीणा हे खूप मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत. त्यांना लहानपणापासूनच हिंदी भाषेचे जास्त ज्ञान होते. त्यामुळे यूपीएससी परीक्षा देणे हे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. परंतु त्यांनी या सर्व गोष्टींवर मात करत यूपीएससी परीक्षेत टॉप केले.
विकास यांनी राजस्थानमधील एका लहान गावातून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांना नेहमी खूप कमी साधनांमध्ये अभ्यास केला. त्यांना शिक्षणासाठी जास्त सुविधा किंवा कोणचेही मार्गदर्शन लाभले नाही.
विकास यांनी दोनवेळा यूपीएससी परीक्षा दिली. एकदा नाही तर सलग दोनदा त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केला. पहिल्यांदा त्यांची निवड ही आयपीएस पदावर झाली. परंतु त्यांना आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी आयएएस होऊनच दाखवले.
विकास आणि त्यांचे भाऊ दोघेही यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला शिफ्ट झाले. भाड्याच्या खोलीत राहू लागले. विकास जेव्हा दिल्लीला शिफ्ट झाले तेव्हा हिंदी भाषेतून यूपीएससी देण्याकडे जास्त लोकांचा कल नव्हता. खूप कमी उमेदवार निवडले जात होते.
परंतु त्यांनी या सर्व गोष्टीचा विचार सोडून अभ्यासाकडे लक्ष दिली. त्यांनी आपली तयारी सुरु ठेवली. त्यांनी आपल्या आत्मविश्वासामुळे यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी एकदा नाही तर दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. विकास हे नेहमी सांगतात की, परीक्षेच्या आधी एक वर्षभर अभ्यास करुनही त्यांना काहीच कळत नाही. पेपरच्या भीतीमुळे असे घडते. त्यामुळे आजिबात घाबरु नका. हे खूप सामान्य नाही. ही भीती गांभीर्याने घेऊ नका. तुम्ही चांगला अभ्यास केला तर परीक्षेच्या दिवशी सर्वकाही करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.