Success Story: ब्युटी विथ ब्रेन! डान्स अन् अभिनयाची आवड जोपासत केली UPSC क्रॅक; IPS श्रृती अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IPS Shruti Agarwal: आयपीएस श्रृती अग्रवाल यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांना अभिनय आणि डान्सची खूप आवड होती. ही आवड जोपासत त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी स्वप्न असते. प्रत्येकाला आपली वेगळी ओळख निर्माण करायची असते. यासाठी तुम्ही स्वतः असं काहीतरी करा की जेणेकरुन संपूर्ण समाज तुम्हाला आदराने ओळखले. असंच काहीस आयपीएस श्रृती अग्रवाल यांनी केलं. त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. आज प्रत्येक ठिकाणी त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

Success Story
Success Story: दहावीत फक्त ५७ टक्के, कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यास नकार, मोठ्या जिद्दीने IAS झाला, वाचा आकाश कुल्हारी यांचा प्रवास

श्रृती अग्रवाल यांचा प्रवास

श्रृती अग्रवाल या मूळच्या झारखंडच्या गिरिडीहच्या रहिवासी आहे. त्यांना डान्स आणि अॅक्टिंगची आवड होती. एक वेळ अशी होती की, श्रृती यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमधील मिरांडा हाउसमध्ये आणि आपल्या डान्सने आणि अॅक्टिंगने वेगळी ओळख निर्माण केली होती.

श्रृती यांनी २०२३ मध्ये यूपीएससी सिविल सेवा परीक्षा क्रॅक केली. त्यांनी ५०६ रँक प्राप्त केली. त्यानंतर त्या आयपीएस म्हणून रुजू झाल्या.

श्रृती अग्रवाल यांचे शिक्षण

श्रृती यांनी सुरुवातीचे शिक्षण झारखंडमधील देवघर येथे केले. मॅट्रिकनंतर त्यांनी इंटरमीडिएट बोकारे येथून केले. श्रृती या लहानपणापासूनच हुशार होत्या. अभ्यासात तर हुशार होत्या. त्याचसोबत त्यांनी डान्स आणि अभिनयातदेखील खूप काम केले. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. श्रृती या नेहमी डान्स आणि थिएटर शोमध्ये भाग घ्यायच्या.

ग्रॅज्यूएशन पूर्ण झाल्यानंतर श्रृती यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आयपीएस होण्याचे ठरवले. आयपीएस होण्याच्या प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या. पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले. म्हणून त्या खूप निराश होत्या. परंतु तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०२३ मध्ये ही परीक्षा क्रॅक केलीच.

Success Story
Success Story: 'फी'साठी आईचे सोनं गहाण ठेवले, मावळचा लेक CA झाला, रिक्षाचलाकाच्या मुलाचा संघर्ष वाचून डोळ्यातून पाणी येईल

डान्स अन् अभिनयाची आवड जोपासली

श्रृतीने आपली डान्स आणि अॅक्टिंग करण्याचा छंद कधीच सोडला नाही. यूपीएससी परीक्षा पास केल्यानंतर ट्रेनिंगच्या वेळी डान्स आणि अॅक्टिंग प्रोग्राममध्ये त्या भाग घ्यायच्या. त्या सोशल मीडियावरदेखील खूप व्हिडिओ शेअर करतात. आवड जोपासत त्यांनी शिक्षणातदेखील आपले वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

Success Story
Success Story: अभ्यासाचा ताण, आत्महत्येचा विचार, जिद्दीने तयारी केली अन् IPS झाला, अमित लोढा यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com