Manasvi Choudhary
'होम मिनिस्टर' या शोमधून संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे महाराष्ट्राचे लाडके भावोजी.
आदेश बांदेकर यांनी त्यांच्या अचूक विनोदीशैलीमुळे प्रत्येक घराघरातून प्रसिद्धी मिळवली आहे.
आदेश बांदेकर यांना मानणारा चाहतावर्ग देखील मोठा आहे.
आदेश बांदेकर यांचा जन्म १८ जानेवारी १९६६ मध्ये अलिबागमध्ये येथे झाला.
पुढे लहानाचे मोठे आदेश बांदेकर हे लालबाग - परळमध्ये झाले.
आदेश बांदेकर यांना ढोल वाजवण्याची आवड होती यामुळे गणपती मिरवणूकीमध्ये ते ढोल वाजवण्यासाठी जायचे.
आदेश बांदेकरांना दहावीत केवळ ३७ टक्के मार्क होते तरी त्यांनी पुढे शिक्षण सुरू ठेवलं.
पुढे त्यांनी कॉमर्समधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आता मुबंईच्या माटुंगामधून L.L.B. ची परीक्षा दिली.