Success Story: 'फी'साठी आईचे सोनं गहाण ठेवले, मावळचा लेक CA झाला, रिक्षाचलाकाच्या मुलाचा संघर्ष वाचून डोळ्यातून पाणी येईल

Success Story of Maval CA Pankaj Pimpre: मावळचा पंकज पिंपरे हा सीए झाला आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्याने मोठ्या मेहनतीने अभ्यास केला. आणि हे यश मिळवलं आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

दिलीप कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

इंडस्ट्रूट ऑफ चार्टर अकाउंट ऑफ इंडियाच्या मे 2025 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. मावळच्या टाकळी खुर्द येथील पंकज बाळासाहेब पिंपरे याने अवघ्या 22 व्या वर्षी सीए पदवी प्राप्त केली आहे.त्याने सीए परीक्षा पास केली आहे.

Success Story
Success Story: M.Phil केलं, शिक्षक झाली, नंतर पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS प्रीति चंद्रा यांचा प्रवास

रिक्षाचालकाचा लेक झाला सीए

मावळच्या पंचक्रोशीतून पंकज वर शुभेच्छांचा वर्षाव होत.पंकजचे वडील बाळासाहेब पिंजरे हे रिक्षाचालक आहेत. संपूर्ण कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्याकरिता त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पंकजचे प्राथमिक शिक्षण टाकवे येथील जिल्हा परिषद शाळेत तर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण लोणावळा येथे झाले आहे. कोरोना काळात कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. परीक्षा फी भरण्यासाठी त्यांना दागिने गहाण ठेवावे लागले होते.मात्र, परिस्थितीवर मात करून पंकजने केवळ दोन महिन्याच्या अभ्यासात सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण केली.

Success Story
Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

सीए इंटरच्या दोन्ही ग्रुप्स मध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नात पार केले नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी सीए फायनल परीक्षा दिली पण परीक्षा सुरू होण्याच्या आठवड्याभर आधी त्याच्या आजीचे निधन झाले. या दुःखद प्रसंगाचा मानसिक धक्का बसून त्याला अपयश आले. मात्,र जिद्द न सोडता पुढील अडीच महिन्यात दररोज 15 ते 17 तास अभ्यास करत त्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला. पंकजने यशस्वीरित्या सी ए फायनल ची परीक्षा उत्तीर्ण झाला. यावेळी आई-वडील आणि गुरुजनांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे मी सीए झालोय..

भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. पंकज च्या या प्रेरणादायी वक्तव्याने मावळतील अनेक तरुणांना नवी संजीवनी मिळाली आहे.

Success Story
Success Story: आईपण भारी देवा! प्रेग्नंट असताना दिली स्पर्धा परीक्षा, पहिल्याच प्रयत्नात IPS; शहनाज इलियास यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com