Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

CA Anna Sebastian Perayil Death Case: ईवाय कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामाच्या अति ताणामुळे चार्टर्ड अकाऊंटंट तरुणी ॲना सेबॅस्टियन पेरियालचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.
Pune CA Death Case:  सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप
CA Anna Sebastian Perayil Death CaseSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

'ईवाय’ मधील तरुणीच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. 'अर्न्स्ट अँड यंग' या कंपनीत काम करणाऱ्या सीए तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी केंद्रीय कामगार मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ॲना सेबास्टियन पेरायिल असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आईने ईवाय इंडियाच्या प्रमुखांना लिहिलेला ई-मेल समाजमाध्यमांत व्हायरल झाला. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. केंद्रीय कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जाहीर केले आहेत.

कामाच्या अति ताणामुळे पुण्यामध्ये राहणाऱ्या चार्टर्ड अकाऊंटंट तरुणी ॲना सेबॅस्टियन पेरियालचा मृत्यू झाला होता. 'अर्न्स्ट अँड यंग' या कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर अवघ्या ४ महिन्यातच तिचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाला. ॲना सेबॅस्टियन पेरियालचा मृ्त्यू जुलै महिन्यात झाला होता. पण तिची आई अनिता ऑगस्टियनने कंपनीवर गंभीर आरोप केल्यामुळे हे प्रकरण आता चर्चेत आले आहे. कामाच्या दबावामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी कंपनीवर केला आहे.

Pune CA Death Case:  सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप
Mumbai-Pune Travel: मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट, अटल सेतूला एक्स्प्रेस वे जोडणार, अवघ्या २ तासांत पुण्यात पोहचणार; वाचा सविस्तर

ॲनाच्या आईने ईवाय कंपनीच्या भारतातील प्रमुखांना केलेल्या पत्रात अनेक आरोप केले आहेत. ॲनाला कामाचा प्रचंड ताण होता. तिला खूप जास्त काम करावे लागत होते. ती रात्र-रात्र आणि आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी देखील काम करायची. तिला झोप मिळत नव्हती. त्यामुळे तिला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. ६ जुलै रोजी पुण्यातील दीक्षांत समारंभामध्ये ॲनाच्या छातीत दुखू लागले होते त्यानंतर तिला डॉक्टरकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी कमी झोप आणि कमी जेवणामुळे तिला त्रास झाल्याचे सांगितले होते. २० जुलैला ॲनाचा मृत्यू झाला. ती २६ वर्षांची होती. तिच्या मृत्यूनंतर कंपनीचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी तिच्या अंत्यविधीला आला नव्हता.

Pune CA Death Case:  सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप
Pune News: पुण्यात नोकरी, ४ महिन्यांतच मृत्यू; २६ वर्षीय CA तरुणीचा 'वर्क प्रेशर'मुळं मृत्यू झाल्याचा आईचा आरोप

ॲना सेबॅस्टियन पेरियाल केरळच्या कोची येथील रहिवासी होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये ती सीएची परीक्षा पास झाली. ॲनाला मार्च २०२४ मध्ये ENY या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. ॲना सेबॅस्टियन पेरियालने सेक्रेड हार्ट कॉलेज थेवरा येथून बॅचलर ऑफ कॉमर्स इन फायनान्स अँड टॅक्सेशनचा अभ्यास केला. बीकॉम पूर्ण केल्यानंतर तिने सीएची तयारी सुरू केली आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये ॲनाने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली होती. ॲना खूपच हुशार मुलगी होती. ती विवाहित होती. तिच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Pune CA Death Case:  सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप
Pune crime : पत्नीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल; शिक्षक पतीला राग अनावर, बिहारी मित्राच्या मदतीने त्याचा काटा काढला!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com