Success Story
Success StorySaam Tv

Success Story: M.Phil केलं, शिक्षक झाली, नंतर पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS प्रीति चंद्रा यांचा प्रवास

Success Story of IPS Preeti Chandra: आयपीएस प्रीती चंद्रा यांना लेडी सिंघम म्हणून ओळखले जाते. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात कोणत्याही कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.
Published on

यूपीएससी (UPSC) ही परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्षा देऊन आयएएस आणि आयपीएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा काही कारणांमुळे स्वप्न मागे राहतात. परंतु कितीही काहीही झालं तरीही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो. असंच काहीसं प्रीति चंद्रा यांच्यासोबत झालं.

प्रिति चंद्रा यांचा प्रवास (IPS Preeti Chandra Journey)

राजस्थानच्या प्रीति चंद्रा या आयपीएस ऑफिसर आहेत. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण गावातील सरकारी शाळेतून केले. त्यानंतर त्यांनी यपुर येथील महारानी कॉलेजमधून एमए शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बीएड केले. त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी काम केले.

पत्रकारिता करता करता त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यानंतर त्यांनी M.Phil पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिक्षिका म्हणूनदेखील काम केले. त्या मुलांना शिकवायच्या.

प्रीति चंद्रा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा (UPSC) क्रॅक केली आहे. त्यांनी २००८ मध्ये कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय परीक्षा पास केली आहे. त्यानंतर त्यांचे आयपीएस पदासाठी सिलेक्शन झाले.

Success Story
Success Story: AI च्या मदतीने अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात IAS, विभोर भारद्वाज यांचा प्रेरणादायी प्रवास

प्रीति चंद्रा यांचे वडील रामचंद्र सुंडा हे रिटायर्ड जवान आहेत. प्रीति यांची पहिली पोस्टिंग अलवरमध्ये एसएसपी म्हणून झाली. त्यानंतर त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी काम केले. त्यांनी करौली येथे एसपी पदावर काम केले. या काळात त्यांनी आपल्या ईमानदारीमुळे अनेकांना धडा शिकवला आहे. त्यांना लेडी सिंघम म्हणूनदेखील ओळखले जाते.

Success Story
Success Tips : आयुष्यात यश मिळवण्याचे हे नियम तुम्हाला माहितीयेत का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com