दिल्ली भूकंपाने हादरली! हरियाणा केंद्र, नागरिक भयभीत, घराबाहेर पळाले | Delhi NCR

Earthquake Today in Delhi: उत्तर भारतात सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात भीतीचं वातावरण. रोहतक येथे ४.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप नोंद.
Earthquake
Earthquake in DelhiSaam tv
Published On

भारताची राजधानी दिल्ली येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर भारतातील दिल्ली-एनसीआर, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशसह अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती समोर आली आहे. हरियाणातील रोहतक येथे ४.१ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदवली गेल्याची माहिती आहे.

गुरूवारी सकाळी दिल्ली एनसीआरमध्ये पावसादरम्यान, भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. सुमारे १० सेकंद भूकंपाचे धक्का जाणवल्याची माहिती आहे. सकाळी ९:०४ वाजता भूकंपाचे धक्का जाणवले आहेत. हे धक्के दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरूग्राम, फरीदाबाद, रोहतक आणि सोनीपत येथेही जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्र हरियाणा असल्याची माहिती आहे. भूकंपाच्या धक्क्यांना घाबरून लोक घरे आणि कार्यालयांमधून बाहेर पळाले आहेत.

Earthquake
Divorce: '३ दिवस एकच अंडरवेअर घालतोस, आंघोळ करत नाहीस...मला काडीमोड हवाय' पत्नीचं डिव्हॉर्स लेटर व्हायरल

यासंदर्भात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. भूकंपानंतर सर्वजण सुरक्षित असतील, अशी आशा त्यांनी पोस्टद्वारे व्यक्त केली आहे. तसेच सर्वांसाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

भूकंप केव्हा घडते?

पृथ्वीच्या आत ७ टेक्टोनिक प्लेट्स असतात. या प्लेट्स सतत फिरत असतात. जेव्हा हे प्लेट्स एकमेकांवर आदळतात, एकमेकांवर घासतात, एकमेकांवर चढतात किंवा एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा जमीन हादरायला लागते. यालाच भूकंप म्हणतात. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. ज्याला रिश्टर मॅग्निट्यूड म्हणतात.

Earthquake
Russian Girl Married Indian: रशियन तरुणीशी केलं लग्न; अशी फुलली भारतीय तरुणाची लव्ह स्टोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com