
बिहारमधील कटिहारमध्ये नुकताच पार पडलेला एक अनोखा विवाहसोहळा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कटिहार येथील रहिवासी डॉ. अनुभव शाश्वत यांनी रशियातील रहिवासी अनस्तासियाशी हिंदू विधीनुसार लग्न केलं. दोघांनीही दुर्गा मंदिरात पारंपारिक पद्धतीने सात फेरे घेतले. परदेशी सुनेनं तिच्या साधेपणाने आणि भारतीय संस्कृतीशी असलेल्या प्रेमाने सर्वांचे मन जिंकले आहे.
अनुभव शाश्वत यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत सांगितले की, '२०१७ साली मी रशियाला शिक्षण घेण्यासाठी गेलो होतो. २०२० साली माझी ओळख अनस्तासियाशी झाली. सुरूवातीला मैत्री झाली. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. नंतर मी तिला लग्नासाठी मागणी घातली', असं अनुभवने सांगितलं.
रिलेशनशिप ते लग्नापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, असं अनुभव म्हणाला, 'अनस्तासियाला आधी लग्नाची मागणी घातली. ती लग्नासाठी तयार झाली. भारतीय संस्कृती आणि परंपराची ओळख करून देण्यासाठी तिला दोन ते तीन वेळा भारतात आणले. तिच्यासोबत भारत भ्रमंती केली. नंतर दिल्लीत राहून तिला भारतीय लाईफस्टाईल शिकवली', असं अनुभव म्हणाला.
'सुरूवातीला कुटुंबाने या लग्नाला नकार दिला होता. नंतर अनस्तासियाचा स्वभाव घरच्या मंडळींना आवडला. अखेर कुटुंबाची संमती मिळाली'. अशी माहिती अनुभवने दिली. यानंतर दोघांनी हिंदू विधीनुसार लग्न करण्याचे ठरवले. कटिहारच्या दुर्गा मंदिरात दोघेही लग्न बंधनात अडकले. अनस्तासियाचा साधेपणा, भारतीय संस्कृतीचा आदर फक्त सासरच्या मंडळींना भावला नाही, तर परिसरातील लोकांनीही 'बिहारच्या बहुरानीचं' कौतुक केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.