Amdar Nivas: किळसावाणा! आमदार निवासातील 'सुग्रास' जेवणाचा आणखी व्हिडिओ; भाजीत सापडला सुतळीचा तुकडा

Mumbai Aamdar Nivas Viral Video: मुंबईच्या आमदार निवासातील कॅन्टीनमधील जेवणाच्या दर्जावरून आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्याचवेळी सुतळी सापडलेला आणखी एक भोजन व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Mumbai Aamdar Nivas Viral Video
Mumbai Aamdar Nivas Viral VideoSaam tv news
Published On

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून गायकवाड संतापले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला बेदम चोप दिला. याचा व्हिडिओही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. दरम्यान, आमदार निवासातील जेवणाच्या दर्जावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आलं आहे. एका व्हिडिओमध्ये भाजीत सुतळीचा तुकडा दिसत आहे. या व्हिडिओमुळे कँटीन व्यवस्थापनावर पुन्हा एकदा सवाल उपस्थित होत आहे.

मंत्रालयातील सुग्रास भोजनाचा नवा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार निवासातील भोजनात सुतळीचा तुकडा दिसत आहे. जेवण करत असलेल्या कर्मचाऱ्याने व्हिडिओ शूट करून शेअर केला. या व्हिडिओमध्ये, 'हेच खायचं का?' असा संतप्त सवाल कर्मचाऱ्याने उपस्थित केला आहे. हे दोन्ही प्रकार उघडकीस आल्यानंतर जेवण पुरवणाऱ्या कॅन्टीनवर ताशेरे ओढले जात आहे.

Mumbai Aamdar Nivas Viral Video
Pune: 'बाटलीतील पाणी पी नाही तर...' धर्मगुरू अन् नणंदेकडून ख्रिश्चन धर्मांतरासाठी दबाव, शिवीगाळ अन् मारहाण करत..

आमदाराकडून कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं होतं. कॅन्टीनमधील जेवण निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्यांना राग अनावर झाला. त्यांनी कॅन्टीनमध्ये येऊन कॅन्टीन ऑपरेटरच्या कानशिलाच लगावली. तसेच मारहाणही केली. यादरम्यान, कॅन्टीनमध्ये एकच गोंधळ उडाला होता. याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला.

Mumbai Aamdar Nivas Viral Video
Viral Video: चक्क पोलिसांकडून चोरी! जनरल डब्यातील झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल लंपास केला, VIDEO व्हायरल

यापूर्वीही संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली होती, अशी माहिती त्यांनी स्वत: दिली. मात्र, पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाचं जेवण खायला दिल्यामुळे त्यांचा रागाचा पारा चढला. दरम्यान, आमदार निवासातील सुग्रास जेवणाचा आणखी एक व्हिडिओ समोर आल्यानं निवासातील ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com