Pune: 'बाटलीतील पाणी पी नाही तर...' धर्मगुरू अन् नणंदेकडून ख्रिश्चन धर्मांतरासाठी दबाव, शिवीगाळ अन् मारहाण करत..

Christian Conversion Pressure in Pune: पुण्यात विवाहितेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्तीचा प्रकार उघड. नणंद आणि धर्मगुरूंविरुद्ध गुन्हा दाखल. धार्मिक स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना.
Christian Conversion Pressure in Pune
Christian Conversion Pressure in Punesaam tv news
Published On

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी विवाहितेवर तिच्या नणंदेसह एका धर्मगुरूकडून जबरदस्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारत नसल्यामुळे नणंदेनं महिलेला मारहाण केली. तसेच धर्मगुरूंनी तिला धमकी दिली. याच त्रासाला कंटाळून अखेर महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १९ वर्षीय पीडित महिलेच्या नणंदेनं विवाहितेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. जेव्हा विवाहित महिलेनं नकार दिला, तेव्हा महिलेला मारहाण करण्यात आली होती. तसेच नणंदेनं शिवीगाळ केली.

Christian Conversion Pressure in Pune
'..यांना एकत्र येऊ देऊ नका' मीरा भाईंदरमध्ये मराठी आंदोलकांची धरपकड; गुजराती-मारवाडी चिडवत होते | Marathi Morcha

या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने विवाहितेला धर्मांतरासाठी दबाव टाकला होता. 'मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस..धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल', अशी धमकी धर्मगुरूंनी दिली होती. वारंवार धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत होता.

Christian Conversion Pressure in Pune
Bollywood Singer: वरळी सी लिंकवर प्रसिद्ध गायकाचा आत्महत्येचा प्रयत्न? की पब्लिक स्टंट? व्हिडिओ व्हायरल

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

पुण्यातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १८ तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी १० हून अधिक परदेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

परिमंडळ ४ अंतर्गत विमानतळ पोलिसांनी साई अपेक्स इमारतीतील 'मेन्शन स्पा सेंटर'वर छापा टाकून १६ तरुणींची सुटका केली. यात १० परदेशी तरुणींचा समावेश आहे. या प्रकरणी स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि जागेचा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या कारवाईत बाणेर परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकून २ तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणीही मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited: Bhagyashree Kamble

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com