Bollywood Singer: वरळी सी लिंकवर प्रसिद्ध गायकाचा आत्महत्येचा प्रयत्न? की पब्लिक स्टंट? व्हिडिओ व्हायरल

Yasser Desai Seen on Sea Link Railing: बॉलिवूड गायक यासेर देसाई यांचा वरळी सी लिंकवरचा स्टंट व्हायरल; आत्महत्येचा प्रयत्न की प्रसिद्धीसाठी खेळ? समाजात संताप; पोलिसांकडून चौकशीची मागणी.
Yasser Desai Caught Climbing Worli Sea Link
Yasser Desai Caught Climbing Worli Sea LinkSaam tv news
Published On

कलाविश्वातून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे. बॉलिवूड गायक यासेर देसाई यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये देसाई हे कठड्यावर चढताना दिसत आहे. त्यामुळे यासेर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला की, आगामी गाण्याच्या प्रसिद्धीसाठी स्टंट केला, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, व्हिडिओ व्हायरल होतात नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?

बॉलीवूड गायक यासेर देसाई यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सोमवारी सकाळी यासेर वरळीच्या सी लिंकवर गेले. नंतर ते सी लिंकच्या कठड्यावर चढताना दिसत आहे. देसाई याने आत्महत्येचा प्रयत्न केला की, आगामी गाण्याच्या प्रसिद्धीसाठी स्टंट करत आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Yasser Desai Caught Climbing Worli Sea Link
Sarpanch: 'बाबा, तुम्हीच आमचे विठ्ठल' वारीहून वडील परतले, सरपंच मॅडमच्या कृतीने वेधलं लक्ष; नेटकरी भावूक

या प्रकारामुळे केवळ लोकांची वाहतुकीची सुरक्षितता धोक्यात आली नाही, यासेर यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला असता. यासेर देसाईसारख्या प्रसिद्ध व्यक्तींकडून अशा प्रकारच्या वागणुकीने समाजावर चुकीचा प्रभाव पडू शकतो, अशी जोरदार टीका सोशल मीडियावर होत आहे. नेटकऱ्यांनी यासेर याने केलेल्या कृतीचा निषेध केला आहे.

वरळी सी लिंकवर उभे राहण्याची परवानही नेमकी कुणी दिली? असाही प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी आणि त्वरीत चौकशी सुरू करावी, अशी मागणी देखील नेटकऱ्यांनी केली. सध्या नेटकऱ्यांकडून यासेर देसाई याच्यावर टीका केली जात आहे.

Yasser Desai Caught Climbing Worli Sea Link
CM Fadnavis: मीरा भाईंदर मोर्चाला परवानगी का दिली नाही? CM फडणवीसांनी सांगितलं कारण; मनसेवर डागली तोफ

यासिर देसाई नेमका कोण?

यासिर देसाई हा बॉलिवूड सिंगर असून, त्याचा जन्म मुंबईत झाला. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यानं गायनाला सुरूवात केली. 'दिल को करार आया', 'हुए बेचैन ' 'आँखों मे आंसू लेके', अशा अनेक हिट गाणी त्यांनी गायली आहेत. याशिवाय त्यांनी अनेक वेब सीरिज आणि टीव्ही मालिकांना त्यांनी आपला आवाज दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com