
एक अजब चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक आरपीएफ जवान ट्रेनच्या जनरल डब्यातून झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरून खिशातून काढताना दिसत आहे. झोपलेल्या प्रवाशाला याची काहीच कल्पना नसते. नंतर जवान प्रवाशाला उठवतो. नंतर 'तुमचा फोन कुठे आहे?' असं विचारतो. तेव्हा तो खडबडून जागा होतो आणि फोन शोधायला लागतो. तेव्हा फोन खिशात ठेवून झोपणं चुकीचं असल्याचं सांगितलं.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आरपीएफ जवान दिसत आहे. तो वरच्या बाकावर झोपलेल्या प्रवाशाजवळ जातो. त्याच्या खिशात मोबाईल असतो. तो जवान हळूच मोबाईल काढतो आणि लपवतो. त्यानंतर जवान प्रवाशाला उठवतो.
नंतर, 'तुमचा फोन कुठे आहे?' असा प्रश्न विचारतो. हे ऐकून प्रवासी घाबरतो. नंतर फोन शोधू लागतो. दरम्यान, पोलीस त्याला फोन परत करतो आणि त्याला सांगतो, फोन वरच्या खिशात ठेवून गाढ झोपणे चुकीचे आहे.
यादरम्यान, आरपीएफ जवान प्रवाशांना, ट्रेनमध्ये असलेल्या इतर प्रवाशांना मोबाईल फोन नेहमी पँटच्या खिशात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. असे केल्याने चोरट्याला फोन काढण्यास अडचण होईल. एकाने या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत ८८ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.