Sakshi Sunil Jadhav
परदेशात जाण्याची बैठका होतील. काहीतरी प्लॅन केले जातील योग्य तो मार्ग निघेल. मात्र आज कुठल्याही सरकारी कामांमध्ये अडकून राहू नका.
जुन्या केलेल्या गुंतवणुकी मधून लाभ संभवतो आहे. मग ते पैशाशी निगडित असो किंवा व्यक्तीशी निगडित दोन्ही मधून चांगली फलित आज मिळणार आहेत.
धावपळ आणि धडपडी मधून यश मिळणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा होईल. पण त्यामधून कळसाध्याय गाठणार आहात.
शंकराची उपासना करा. मनस्वास्थ्य राहण्यासाठी आज अनेक गोष्टी करावे लागतील. भाग्यदाराक घटना आज घडणार आहेत.
ठरवलेल्या गोष्टी तशा होणार नाहीत. करायला सुरुवात केले की अडचणी येतील. पण त्या पार करून पुढे जाल. काळजी घ्यावी.
बौद्धिक गोष्टीमध्ये अग्रेसर राहाल. व्यवसायामध्ये नव्या काही गोष्टी अवलंबाल. भरभराटीचे दृष्टीने दिवस चांगला आहे.
स्त्रियांना मासिक पाळीच्या तक्रारी वाढतील. एकूणच कामाशी वेगळीच धावपळ आहे. यश मिळत असल्यामुळे शत्रूंमध्ये सुद्धा वाढ होईल.
क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर राहाल. संततीचा वरचढपणा आज मान्य करावा लागेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला आहे.
घरामध्ये एखादे धार्मिक कार्य होण्याचा संभव आहे. सगळेजण एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणात दिवस व्यस्त राहील.
नोकरी व्यवसायामध्ये भरभराट होण्याचा आजचा दिवस आहे. जवळच्या प्रवासामुळे मन सुखावून जाईल.
संशोधनात्मक कार्य कराल. जगण्याची वेगळी कला आज अवगत होईल. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे.
कोणत्याही परिस्थितीत आज पाठीमागे जाण्याचा विचार नाही. खंबीरपणे दिवसाला तोंड द्या.