Sakshi Sunil Jadhav
पूजेसाठी धूप हे अत्यंत आवश्यक मानले जाते. सणासुदीमध्ये याचा जास्त प्रमाणावर वापर केला जातो.
तुम्ही पुढील सोप्या पद्धतीने घरच्या घरी सुंगधीत धूप बनवू शकता.
सुकलेली फुलं, गुलाबाच्या पाकळ्या, नारळाची शेंडी, लवंग, कापूर वड्या, दालचिनी, तमालपत्र, चंदन पावडर, साजूक तूप, गुलाब पाणी इ.
सगळ्यात आधी सुकलेली फुलं, गुलाबाच्या पाकळ्या, नारळाच्या शेंडी, लवंग, कापूर, दालचिनी, तमालपत्र एकत्र करा.
आता या सगळ्याचे बारिक पावडरप्रमाणे मिश्रण तयार करा.
पुढे वाटून घेतलेली पूड चहाच्या गाळणीने गाळून घ्या.
पावडरमध्ये चंदन, साजूक तूप आणि गुलाब पाणी मिक्स करुन मळून घ्या.
तयार पीठाचे छोटे गोळे करुन त्रिकोणी उभट आकार देऊन धूपच्या काड्या तयार करा.
तयार धूपाच्या काड्या एका ताटात ठेवून फॅनखाली चांगल्या वाळवून घ्याव्या. तयार आहे धूप.