Sakshi Sunil Jadhav
त्वचा चमकदार आणि केस मजबूत करण्यासाठी शरीराला काही जीवनसत्वांची आवश्यकता भासते.
तुम्ही पुढील पदार्थांचे सेवन केलेत तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.
दूध, अंडी, सोयाबीन आणि पालेभाज्या यांचे सेवन केल्याने तुमच्या डोळ्यांना आणि हाडांना फायदा होतो.
व्हिटॅमिन बीमध्ये मसूर डाळ, अंडी, मासे, अक्रोड, पिस्ता आणि दूधाचे सेवन करा.
व्हिटॅमिन सी त्वचेच्या सुरकुत्या पडण्यापासून आणि केस गळण्यापासून वाचवते. तुम्ही यात पेरु, पपई, ब्रोकोली, पालक खाऊ शकता.
मासे, दूध अंडी यातून व्हिटॅमिन डी मिळते. त्यामुळे त्वचा चमकदार होते आणि केस वाढतात.
त्वचेला हायड्रेट ठेवण्याची गरज असते. त्यासाठी तुम्ही शेंगदाणे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करु शकता.
तुम्ही या व्हिटॅमिन्स मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे केस आणि तुमची त्वचा चमकदार होईल.