Sakshi Sunil Jadhav
सकाळचा पौष्टीक नाश्ता नियमित गरजेचे असते. पण तुम्ही त्याच त्याच नाश्त्याला कंटाळला असाल तर काकडीचे खमंग पोहे करुन पाहाच.
पोहे, किसलेली काकडी, ओले खोबरे, मीठ, तेल, चण्याची डाळ, उडीदाची डाळ, हिंग, शेंगदाणे, मुगाची डाळ, सुक्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने इ.
पोहे चाळणीत भिजवून ते पूर्णपणे निथळून घ्या. पुढे ताटात काकडीचा किस, पोहे, ओल्या नारळाचा किस आणि मीठ मिक्स करा.
आता कढईत तेल गरम करुन त्यात चणा डाळ, उडदाची डाळ, हिंग, शेंगदाणे, मुग डाळ परता.
पुढे मिरच्या, कढीपत्ता फ्राय करा.
आता पोह्यांचे तयार सारण त्यामध्ये घालून छान हलक्या हाताने मिक्स करा.
आता पोह्यांमध्ये वाफ आल्यानंतर सर्व्ह करा. हे हेल्दी पोहे चवीला उत्तमच असतात.